Mangirbaba Yatra : कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मांगीरबाबा यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:22 PM2021-04-23T13:22:44+5:302021-04-23T13:24:10+5:30

Mangirbaba Yatra canceled due to corona virus मांगीरबाबा देवस्थान समतीची अध्यक्ष भास्कर कचकुरे व सचिव सुरेश नाईकवाडे यांनी लेखी पत्राद्वारे दिली माहिती

Aurangabad's famous Mangirbaba Yatra canceled for second year in a row due to corona outbreak | Mangirbaba Yatra : कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मांगीरबाबा यात्रा रद्द

Mangirbaba Yatra : कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मांगीरबाबा यात्रा रद्द

googlenewsNext

करमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. यासह राज्यातील छोट्या मोठ्या सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात प्रसिद्ध मांगीरबाबा यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती शेंद्रा ( ता.औरंगाबाद)  येथील मांगीरबाबा देवस्थान समतीची अध्यक्ष भास्कर कचकुरे व सचिव सुरेश नाईकवाडे यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे.

मांगीरबाबा यात्रेच्या निमित्ताने राज्यातून हजोरो भाविक याठिकाणी येतात. नवस फेडण्याच्या नावाखाली शरीराला इजा करण्याची अनिष्ट प्रथा इतिहासात पहिल्यांदाच २०१९ साली बंद करण्यात प्रशासनाला यश आले होते. त्यानंतर २०२० साली कोरोनाच्या संसर्गामुळे यात्रा रद्द झाली. तर यावर्षी देखील पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेच्या निमित्ताने येथे लाखोची उलाढाल होत असे. यात्रा रद्द झाल्याने अनेकांना आर्थिक फटका बसणार आहे. 

Web Title: Aurangabad's famous Mangirbaba Yatra canceled for second year in a row due to corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.