औरंगाबादचा दुर्गेश भारतीय तलवारबाजी संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:49 IST2018-05-18T00:48:05+5:302018-05-18T00:49:07+5:30
विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील प्रतिभावान खेळाडू दुर्गेश जहागीरदार याची चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्री तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. शांघाय येथे १८ ते २0 मेदरम्यान होणाºया या स्पर्धेत दुर्गेश जहागीरदार हा फॉईल प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लूट करणाºया दुर्गेश जहागीरदार याने याआधीदेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोनदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आपला विशेष ठसा उमटवला आहे.

औरंगाबादचा दुर्गेश भारतीय तलवारबाजी संघात
औरंगाबाद : विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील प्रतिभावान खेळाडू दुर्गेश जहागीरदार याची चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्री तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. शांघाय येथे १८ ते २0 मेदरम्यान होणाºया या स्पर्धेत दुर्गेश जहागीरदार हा फॉईल प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लूट करणाºया दुर्गेश जहागीरदार याने याआधीदेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोनदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आपला विशेष ठसा उमटवला आहे. राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांचीदेखील भारतीय तलवारबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. भारतीय संघात निवड झालेल्या दुर्गेश जहागीरदार याला ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील प्रशिक्षक आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू तुकाराम मेहेत्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या निवडीबद्दल तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, सचिव बशीर खान, खजीनदार अशोक दुधारे, राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटुळे, खजीनदार राजकुमार सोमवंशी, साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, एनआयएस प्रशिक्षक संजय भूमकर, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन आदींनी दुर्गेश जहागीरदार आणि उदय डोंगरे यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.