औरंगाबादच्या अथर्वने जिंकली आॅल इंडिया टॅलेंट सीरीजचे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:47 IST2018-01-22T00:47:00+5:302018-01-22T00:47:16+5:30

गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर झालेल्या आॅल इंडिया टॅलेंट सीरीज १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अथर्व शिंदे याने विजेतेपद पटकावले. पुण्याच्या वेद पवार याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Aurangabad's Athar won the All India Talent Series title | औरंगाबादच्या अथर्वने जिंकली आॅल इंडिया टॅलेंट सीरीजचे विजेतेपद

औरंगाबादच्या अथर्वने जिंकली आॅल इंडिया टॅलेंट सीरीजचे विजेतेपद

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर झालेल्या आॅल इंडिया टॅलेंट सीरीज १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अथर्व शिंदे याने विजेतेपद पटकावले. पुण्याच्या वेद पवार याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
औरंगाबादच्या अथर्व शिंदे याने सुरेख कामगिरी करीत अंतिम सामन्यात पुण्याच्या वेद पवार याचा ६-०, ६-१ असा सहज पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरी गाठण्याआधी अथर्व शिंदेने उपांत्यपूर्व फेरीत औरंगाबादच्याच अर्णव पांगारकर याचा ८-० आणि उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या कौशल चौधरी याचा ९-६ असा पराभव केला होता, तर वेद पवार याने उपांत्यपूर्व फेरीत कोल्हापूरच्या प्रथमेश पाटील याचा ८-४ आणि उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या अंकित भाटेजा याचा ९-७ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. बक्षीस वितरण संजय गाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आशुतोष मिश्रा, गजेंद्र भोसले, टुर्नामेंट सुपरवायजर प्रवीण गायसमुद्रे यांची उपस्थिती होती.

Web Title: Aurangabad's Athar won the All India Talent Series title