राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या अभय शिंदेचा गोल्डन धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:34 IST2017-11-24T00:33:42+5:302017-11-24T00:34:10+5:30
औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याने दोंडाई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या अभय शिंदेचा गोल्डन धमाका
औरंगाबाद : औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याने दोंडाई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली. या गोल्डन डबल धमाका करणाºया अभय शिंदे याला ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्राचे प्रशिक्षक तुकाराम म्हेत्रे, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल त्याचे राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, तलवारबाजी खेळाचे एनआयएस प्रशिक्षक संजय भूमकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.