शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

औरंगाबादकरांचा पुन्हा विक्रम; मर्सिडीजनंतर आता एकाच वेळी २५० इलेक्ट्रिक वाहनांचे डील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 18:04 IST

केंद्र सरकारच्या प्रस्तावित व राज्य सरकारकडून संचालित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची योजना मार्चपर्यंत वाढविल्यानंतर शहरात २५० वाहने एकाच वेळी खरेदी करण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली.

- अमिताभ श्रीवास्तवऔरंगाबाद : एकाच वेळी दीडशे मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम केल्यानंतर ऐतिहासिक शहर आता एकाच वेळी २५० इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा विक्रम करणार आहे. याबाबतच्या डीलला अंतिम रूप देण्यात आले असून, या महिन्याच्या अखेरपासून मार्चपर्यंत सर्व वाहने ग्राहकांना सुपुर्द करण्यात येणार आहेत.

उद्योग जगतातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या प्रस्तावित व राज्य सरकारकडून संचालित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची योजना मार्चपर्यंत वाढविल्यानंतर शहरात २५० वाहने एकाच वेळी खरेदी करण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. याबाबत वाहनांची उपलब्धता, ही एक समस्या होती. ती आता अदालत रोडवरील शहरातील एका मोठ्या वाहन डीलरने दूर केली आहे. शानदार बुकिंग पाहून महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून तीन महिन्यांत वाहने उपलब्ध करण्यास तयार झाले आहे. याशिवाय गरज पडल्यास आर्थिक साह्यासाठी काही बँकांशीही चर्चा सुरू आहे. यात एका मोठ्या बँकेने कर्ज देण्यासाठी होकारही दिलेला आहे.

वेगळा व गोपनीय प्रयत्नदीडशे मर्सिडीज खरेदी केल्यानंतर औरंगाबादेत २५० इलेक्ट्रिक वाहने एकाच वेळी खरेदी करण्यासाठी वेगळे व गोपनीय प्रयत्न करण्यात येत आहेत. याचा उद्देश संपूर्ण देशाला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे, हा आहे. दुसऱ्या कोणत्या शहराने याची कॉपी करू नये, यासाठी एवढ्या मोठ्या डीलला गुप्त ठेवले जात आहे.

रॅली काढण्याची योजनामोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांचे शहरात आगमन होत असल्यामुळे सामाजिक व पर्यावरणाशी संबंधित लोकही उत्साहित झाले आहेत. एप्रिलमध्ये सर्व वाहनांना एकत्रित करून शहरात एक रॅली काढण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या आवश्यकतेबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढणार आहे.

मागणी अधिक; परंतु उपलब्धता कमीकेंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न व काही क्षेत्रांतील अनिवार्यतेमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. परंतु निर्माते ही मागणी पूर्ण करण्यास समर्थ नाहीत. अनेक कंपन्यांत सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे. काही कंपन्यांनी बाजाराची मागणी लक्षात घेऊन पावले उचलली असून, त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.

डीलबाबत उत्सुकता वाढलीएकीकडे २५० इलेक्ट्रिक वाहनांच्या नव्या डीलच्या चर्चेने जोर धरला आहे तर दुसरीकडे त्याच संबंधातील प्रयत्नात उद्योग जगतातील पदाधिकारी, बडे ऑटो डिलर्सशी विचारपूस करण्याचा सिलसिला सुरू आहे. उपलब्धता व मोहिमेच्या मर्यादेमुळे ग्राहकांचे प्रयत्न लवकरच थांबू शकतात.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरenvironmentपर्यावरण