शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पाणी मिळेना, कचरा हटेना; पथदिवे लागेनात; चार महिन्यांपासून औरंगाबादकर मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:32 IST

पाणी मिळेना, कचरा हटेना आणि पथदिवे लागेना, अशा त्रांगड्यात नागरिक मेटाकुटीने दिवस काढीत आहेत.

ठळक मुद्दे११९ दिवसांपासून शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक वैतागले आहेत

औरंगाबाद : ११९ दिवसांपासून शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक वैतागले आहेत, तर ६० दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना महागडे टँकरचे पाणी घ्यावे लागते आहे. त्यातच आता पावसाळ्याच्या तोंडावर पथदिव्यांचा लपंडाव सुरू झाला आहे. सेवा, सुरक्षा, विकासाचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या पालिका सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आणली आहे. पाणी मिळेना, कचरा हटेना आणि पथदिवे लागेना, अशा त्रांगड्यात नागरिक मेटाकुटीने दिवस काढीत आहेत.

कधी पहाटे तर कधी रात्री तर कधी दिवसा, अशा पद्धतीने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सध्या सुरू असून, आठवड्यातून चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा नवीन पायंडा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाडल्यामुळे शहरवासीय मेटाकुटीला आले आहेत. मुबलक पाणीपुरवठा होत असतानादेखील नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे.

आठवड्यात नियोजन कराअडीच महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाने तीन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. शहरात पाण्याची ओरड कायम आहे. पाणीपुरवठा विभागाने येत्या आठवड्यात दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी गुरुवारी दिले.

दूषित पाणीपुरवठाकोणत्याही दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलवाहिनीत साचलेले आणि नव्याने सोडण्यात आलेले पाणी दूषित होऊन ते नळांना येत आहे. त्यामुळे कावीळसारखे आजार होऊ लागले आहेत. पुंडलिकनगर परिसरात लहान मुलांना ताप येणे, उलट्या होण्यासारखे आजार होऊ लागले आहेत. हा प्रकार शहरातील बहुतांश भागात होतो आहे. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी दूषित पाणीपुरवठ्यावरून आकांडतांडव केले.

नगरसेवकांचा संतापशहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, साथरोगांचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरत आहे. शहराच्या स्वच्छतेवरून स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर नगरसेवक संतप्त झाले.

महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्रघनकचरा व्यवस्थापनासाठी घनसावंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांना ४ महिने महापालिकेत कायम ठेवावे, अशी मागणी करणारे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ९ मार्चपासून मांडुरके पालिकेत शासनाच्या आदेशाने कचरा समस्या सोडविण्यासाठी कार्यरत झाले आहेत. दरम्यान, अंबडचे मुख्याधिकारी नंदकुमार भोंबे बुधवारी सहायक आयुक्त म्हणून महापालिकेत रुजू झाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादWaterपाणी