औरंगाबाद जिल्हा परिषद सीईओ आर्दड यांची अहमदनगरला बदली, पवनीत कौर नव्या सीईओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 14:24 IST2018-04-16T14:23:43+5:302018-04-16T14:24:23+5:30
जिल्हा परिषद सीईओ मधुकरराजे आर्दड यांची आज अहमदनगर मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली. परवीन कौर या सीईओ म्हणून त्यांची जागा घेतील.

औरंगाबाद जिल्हा परिषद सीईओ आर्दड यांची अहमदनगरला बदली, पवनीत कौर नव्या सीईओ
औरंगाबाद : जिल्हा परिषद सीईओ मधुकरराजे आर्दड यांची आज अहमदनगर मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली. जव्हार येथील आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत परवीन कौर या सीईओ म्हणून त्यांची जागा घेतील.
मधुकरराजे आर्दड यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे घेतली होती. त्यांनी अथक परिश्रम व नियोजन करून जिल्ह्यास हागणदारीमुक्त केले. यासोबतच अपंग समावेशित युनिटमध्ये विशेष शिक्षक भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्यामध्ये त्यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात फौजदारी कारवाईसाठी गुन्हे दाखल केले. याच प्रकरणातील ११ शिक्षकांच्या सेवा स्थगितीची कारवाईसुद्धा त्यांनी केली.
दरम्यान, आर्दड यांच्या जागी पवनीत कौर यांची मुख्य कार्यकारी पदी नियुक्ती झाली आहे. कौर याआधी जव्हार येथे आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.