औरंगाबादच्या महिला हॉकीपटू रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:10 IST2018-01-18T01:10:00+5:302018-01-18T01:10:13+5:30

रांची येथे १ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सिनिअर महिलांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्ट्र संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे.

 Aurangabad women's hockey player goes off | औरंगाबादच्या महिला हॉकीपटू रवाना

औरंगाबादच्या महिला हॉकीपटू रवाना

औरंगाबाद : रांची येथे १ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सिनिअर महिलांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्ट्र संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून प्रियांका वडमारे, छाया राठोड, सरूताई कुंभार, नाजुका मोहिते यांची निवड झाली. हे खेळाडू नुकतेच पुणे येथे रवाना झाले. विशेष म्हणजे प्रियंका वडमारे, छाया राठोड, सरूताई कुंभार व नाजुका मोहिते यांनी याआधी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
या खेळाडूंना जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष माजी आ. श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, दिनेश गंगवाल, क्रीडा प्रबोधिनीच्या हॉकी प्रशिक्षिका नम्रता सावजी, प्रा. शामसुंदर भालेराव यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title:  Aurangabad women's hockey player goes off