शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

औरंगाबादकरांना आणखी ३ दिवस पाण्याचा त्रास; ऐन उन्हाळ्यात वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:32 IST

ऐन उन्हाळ्यात तब्बल आठ ते नऊ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

औरंगाबाद : शनिवारी, रविवारी जायकवाडी, फारोळा येथे वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. रविवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्यांना सोमवारी पाणी देण्यात आले. शहरातील बहुतांश वॉर्डांमधील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात तब्बल आठ ते नऊ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता वादळामुळे जायकवाडी, फारोळा येथील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद झाल्या. दोन तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. यानंतर रात्री दहा वाजता नक्षत्रवाडी एमबीआर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पुन्हा ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा जायकवाडीतून बंद करावा लागला. सोमवारी पहाटे दोन वाजता वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जायकवाडीतून पुन्हा पंपिंग सुरू करण्यात आले. ते पाणी एमबीआरपर्यंत आल्यानंतर एमबीआरचे पंप पहाटे चार वाजता सुरू करण्यात आले.

दरम्यानच्या काळात सुमारे सहा तास जुन्या जलवाहिनीद्वारे शहराला येणारे पाणी बंद होते. याचा परिणाम सोमवारी जुन्या शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला. सोमवारी दिवसभरातील पाणीपुरवठ्याचे चार ते पाच तास पुढे ढकलण्यात आले. सोमवारी रात्री बारा ते एक वाजेपर्यंत पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू ठेवणार असल्याचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन दिवस लागणार आहेत. सिडको-हडकोत सर्वाधिक पाणीटंचाई आहे. जाधववाडी, मयूर पार्क, मयूरनगर, सुदर्शननगर, सिद्धार्थनगर, टी.व्ही. सेंटर, जयभवानीनगर, अंबिकानगर, मुकुंदवाडी, रामनगर आदी भागांत सातव्या आणि आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. 

शहागंजचे १६ वॉर्ड दुर्लक्षितशहागंजच्या पाण्याच्या टाकीवर १६ वॉर्ड अवलंबून आहेत. काही वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीवरून १८ ते २० तासांचे सप्लाय ठेवण्यात आले आहेत. १८ तास ज्या लाईनवरून नागरिकांनी थेट कनेक्शन घेतले आहेत, त्यांना २० तास पाणी मिळत आहे. येथील बहुतांश वॉर्डांना सातव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शनिवारी, रविवारी जायकवाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वाधिक त्रास शहागंज पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना होत आहे.

मरीमाताजवळील टाकीला १० एमएलडीसिडको एन-५ येथील टाकीवरून मरीमाता पाण्याच्या टाकीला १० एमएलडी पाणी देण्यात येते. या टाकीवर किती वॉर्ड अवलंबून आहेत. या वॉर्डांना किती तास पाणी देण्यात येते. अवघ्या ७ वॉर्डांसाठी दहा एमएलडी  पाणी कसे काय लागत आहे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई