Aurangabad Violence : एमआयएम नगरसेवक फिरोज खान पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 19:47 IST2018-05-15T19:24:01+5:302018-05-15T19:47:36+5:30
दिवसभरातील दुसरी अटक

Aurangabad Violence : एमआयएम नगरसेवक फिरोज खान पोलिसांना शरण
औरंगाबाद - मागील आठवड्यात शहरातील मोती कारंजा, शहागंज, राजाबाजार या भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. मंगळवारी सकाळी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांची क्रांतीचौक पोलीस स्थानकात एसआयटीने चौकशीकरून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता या घटनेची दुसरी मोठी बातमी समोर आली आहे. एमआयएम नगरसेवक फिरोज खान पोलिसांना शरण आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे.
आज सकाळी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यास एसआयटी कडून अटक केली. याच वेळी पोलीसांचा मोठा फौजफाटा एमआयएमचे विरोधी पक्ष नेता फेरोज खान याला अटक करण्यासाठी नवाबपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्यापूर्वीच फेरोज खान फरार झाला होता. दिवसभरातील नाट्यमय घडामोडीनंतर सायंकाळी ६.३० वाजता आ. इम्तीयाज जलील यांनी त्याला सिटीचौक पोलीस ठाण्यात हजर केले. यानंतर पोलीसांनी विरोधी पक्ष नेत्याला अटक करून न्यायालयात हजर केले. पोलीसांच्या या अटक सत्रानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.