शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

बनारस हुकले आता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चोपडे यांचा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 6:10 PM

बीएचयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राकेश भटनागर यांची नियुक्ती झाली आहे. मात्र याचवेळी डॉ. चोपडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याचे वृत्त अफवाच ठरल्याचे आज स्पष्ट झाले. बीएचयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राकेश भटनागर यांची नियुक्ती झाली आहे. मात्र याचवेळी डॉ. चोपडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज केला असून, या पदासाठी १३ व १४ एप्रिल रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची वारणसी येथील प्रसिद्ध बीएचयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याचे वृत्त वाराणसी आणि दिल्लीतून प्रकाशित झाले होते. यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्टीकरण देत बीएचयूच्या कुलगुरूपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते. तरीही डॉ. चोपडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत होता. मात्र, बीएचयूच्या कुलगुरूपदाचा निवड आज जाहीर करण्यात आली. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील प्रोफेसर राकेश भटनागर यांची नियुक्ती झाली आहे.

बनारस विद्यापीठाची संधी हुकली असती तरी डॉ. चोपडे यांनी आणखी एक टर्म मिळविण्याच्या आशा सुटलेल्या नाहीत. मुंबई विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना निकालातील दिरंगाईमुळे पदावरून जावे लागले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. यामुळे समिती गठीत करुन पूर्णवेळ कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी पात्र प्राध्यापकांकडून अर्ज मागविण्यात आले. यात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीही अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या तीन सदस्यांच्या समितीने या पदासाठी देशभरातील ३४ जणांना मुलाखतपत्र पाठविले आहे. या सर्वांची मुलाखती १३ व १४ एप्रिल रोजी मुंबईत आयोजित केल्या आहेत.

विद्यापीठातील चार जण पात्रमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी समितीने एकुण ३४ जणांना पात्र ठरविल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात औरंगाबादच्या विद्यापीठातील चार जणांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, माजी बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे आणि प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.  दरम्यान कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज केला होता. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहिले नव्हते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMumbaiमुंबईuniversityविद्यापीठAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र