शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत दुचाकीस्वाराला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:42 IST

बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा भीषण अपघात सहारा सिटीसमोर घडला.

ठळक मुद्देशंभर फूट नेले फरपटत : सहारा सिटीसमोरील भीषण घटना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा भीषण अपघात सहारा सिटीसमोर घडला.भगवान गंगाधर शेळके (४५, रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, भगवान शेळके हे गांधेली शिवारातील सहारा सिटी येथे ठेकेदाराकडे पाच महिन्यांपासून काम करतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता मोटारसायकलवरून कामावर जात होते. सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी ते बायपास ओलांडत असताना जालन्याकडून देवळाई चौकाकडे सुसाट निघालेल्या जीपचालकाने त्यांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, भगवान यांना दुचाकीसह जीपने बायपासवरून सहारा सिटीच्या रस्त्यावर सुमारे शंभर फूट फरफटत नेले. या घटनेत भगवान हे घटनास्थळीच ठार झाले. शहरातील एका लग्न समारंभासाठी निघालेल्या या चालकाने त्याची जीप तेथेच सोडून अन्य प्रवाशांसह पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भगवान यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. एमआयडीसी सिडको ठाण्यात जीपचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.मृत भगवान यांचे मूळ गाव पैठण तालुक्यातील केकत जळगाव आहे. ते बारा वर्षांपूर्वी कामधंद्यासाठी औरंगाबादेत आले. त्यांना दोन मुले आणि दोन विवाहित मुली आहेत. एक मुलगा वाहनचालक, तर दुसरा शिक्षण घेत आहे.मोकळ्या रस्त्याचा गैरफायदाभगवान यांना उडविणारी जीप प्रचंड वेगात होती. रस्त्यावर जडवाहने नसल्याने मोकळा रस्ता पाहून चालकाने जीपचा वेग वाढविला. दुचाकीस्वार भगवान हे रस्ता ओलांडत असल्याचे जीपचालकाच्या लक्षात येताच त्यांनी जीपवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला आणि त्याने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले.जडवाहनांना प्रवेशबंदी तरीही अपघातआॅगस्ट महिन्यात पाच जणांचे बायपासवर बळी गेल्याने पोलीस आयुक्तांनी तेथील वाहतुकीचे नियमन करीत सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी केली. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा प्रयोग सुरू राहणार आहे, असे असताना बायपासवर आज सकाळी जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराला प्राणास मुकावे लागले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू