शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद हादरलं! रूम पार्टनर बाहेर जाताच मैत्रिणीला घरी बोलावलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 20:07 IST

मैत्री की प्रेमसंबंधातून हत्या? घटनेपासून मित्र फरार झाला आहे.

औरंगाबाद : मैत्रिणीला खोलीवर बोलावून तिचा गळा आवळून आणि डोक्यात जड वस्तूने प्रहार करून खून केल्याची खळबळजनक घटना नारेगाव परिसरातील राजेंद्रनगरात बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर तिचा मित्र पसार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

रेणुका देविदास ढेपे (वय १९, रा. ब्रिजवाडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. शंकर विष्णू हगवणे (२४, मूळ रा. धानोरा, ता. लाड कारंजा, जि. वाशिम) असे संशयित मित्राचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शंकर त्याच्या तीन मित्रांसह नारेगावात राजेंद्रनगरातील वसंतराव बनगाळे यांच्या घरात किरायाने राहतो. रेणुका ब्रिजवाडी येथे आई-वडील आणि भावासोबत राहात होती. दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शिक्षण सोडल्याने ती घरीच होती. शंकर हा भाजीपाला विक्रीच्या व्यवसायानिमित्त नारेगाव, ब्रिजवाडीत फिरत असतो. यातून त्याची रेणुकासोबत मैत्री झाली.

बुधवारी सायंकाळी साडेपाचच्यासुमारास शंकरचे ‘रूम पार्टनर’ घरी आले तेव्हा त्यांना आतील खोलीत रेणुका रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसले. शंकरही तेथे नव्हता. त्यांनी ही माहिती तत्काळ घरमालकास फोनवर कळविली. बनगाळे यांनी पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. रेणुकाच्या डोक्यात जोराचा प्रहार करून आणि दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचे त्यांच्या नजरेस पडले. पोलिसांनी सरकारी पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात रवाना केला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धावया घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, सिडको विभागाचे सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मैत्री की प्रेमसंबंधातून हत्या?घटनेपासून शंकर फरार झाला आहे. रेणुका यापूर्वीही एकदा, दोनदा शंकरसोबत त्याच्या खोलीवर आली होती, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. यामुळे या हत्येचा प्रमुख संशयित शंकर हाच आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात शंकरविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी त्याच्या ‘रूम पार्टनर’ कामगारांचीही कसून चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू