औरंगाबाद-तिरुपती आणखी एक फेरी
By Admin | Updated: May 29, 2014 00:21 IST2014-05-29T00:15:37+5:302014-05-29T00:21:02+5:30
पूर्णा : मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने औरंगाबाद- तिरुपती या विशेष रेल्वेची आणखी एक फेरी
औरंगाबाद-तिरुपती आणखी एक फेरी
पूर्णा : मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने औरंगाबाद- तिरुपती या विशेष रेल्वेची आणखी एक फेरी वाढविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. उन्हाळ्याच्या सुट्यात मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्या भाविकांची संख्या मोठी असते. नियोजित आरक्षणक्षमता व प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती (गाडी क्र.०७४०५) ही विशेष रेल्वे औरंगाबाद स्थानकाहून सोडण्यात आली होती. या गाडीला मिळालेल्या प्रतिसादानंतर पुन्हा परत दक्षिण मध्य रेल्वेकडून ३० मे शुक्रवार रोजी या गाडीची आणखी एक फेरी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून दुपारी ३ वाजता सुटणार असून परभणी, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबादमार्गे तिरुपती येथे ३१ मे रोजी दुपारी ३.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती रेल्वेस्थानकावरुन शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुटणार असून दुसर्या दिवशी ही गाडी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला १५ डब्बे असून त्यामध्ये एक वातानुकूलीत थ्री टायर, सहा स्लीपर कोच, सहा जनरल डब्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) प्रवाशांकडून स्वागत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून उन्हाळ्याच्या सुट्यात तिरुपती देवस्थानासाठी दोन वेळा सोडण्यात आलेल्या या विशेष रेल्वेच्या निर्णयाचे मराठवाड्यातील भाविकांकडून स्वागत होत आहे.