शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

औरंगाबादमध्ये शेतीमालाला मातीमोल भाव; दुष्काळानंतर शेतकऱ्यांना पालेभाज्या उत्पादनातही जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:52 IST

हातगाडीवर विक्रेते चढ्या भावात फळभाज्या विकत असले तरी अडत व्यवहारात मात्र शेतकऱ्यांना मातीमोल भाव मिळत आहे.

औरंगाबाद : पाण्याअभावी रबी पीक घेण्याऐवजी फळभाजीपाल्याचे उत्पादन घेतले; पण येथेही शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. कारण भाजीमंडीत असो, वा हातगाडीवर विक्रेते चढ्या भावात फळभाज्या विकत असले तरी अडत व्यवहारात मात्र शेतकऱ्यांना मातीमोल भाव मिळत आहे. एकानंतर एक येणारे संकट बळीराजाची पाठ सोडण्यास तयार नाही. 

पालक १० रुपयाला १० जुडी, मेथी १० रुपयाला ५ जुडी, अशा मातीमोल भावात विकली जात आहे, तर टोमॅटो २५० ते ६०० रुपये, कांदा १०० ते ७०० रुपये, दुधी भोपळा २०० ते ४०० रुपये, तर पत्ताकोबी १५० ते २५० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. दररोज भाजीमंडीत किंवा गल्लोगल्ली हातगाड्यांवर भाजी घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांकडून जे ग्राहक फळभाज्या विकत घेतात त्यांना हे भाव पाहिल्यावर धक्काच बसेल; पण हे सत्य आहे.

जाधववाडीतील  अडत बाजारात मागील आठ दिवसांपासून याच भावात फळभाजीपाला विक्री होत आहे. सकाळच्या वेळी अडत बाजाराबाहेर बसलेले किरकोळ विक्रेते ओरडून-ओरडून पालक १ रुपया गड्डी, मेथी १० रुपयाला ५ गड्डी विकताना दिसून येत आहेत. या भावातही पालेभाज्या शिल्लक राहत आहेत. कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे सातत्याने भाव गडगडत असून, मंगळवारी तर १०० ते ७०० रुपये क्विंटलपर्यंत कांदा विक्री झाला. हाच कांदा बाजारात १२ ते २० रुपयांदरम्यान विकला जात आहे. २ ते ४ रुपये नग विकूनही उरलेला दुधी भोपळा आणखी कमी भावात विकावा लागत आहे. 

यासंदर्भात दादाराव जोगदंडे या शेतकऱ्याने सांगितले की, खरिपाने दगा दिला. आता पाणी कमी असल्याने रबीचे पीक घेण्याऐवजी आम्ही पालेभाज्यांची लागवड केली, पण अडत बाजारातही मातीमोल भावात विकला जात आहे. आम्ही चोहोबाजूने संकटात  सापडलो आहोत. वैजापूरहून कांदा घेऊन आलेल्या कल्याण काकडे यांच्या तर डोळ्यात पाणी आले. कारण, त्यांनी आणलेल्या ५० क्विंटल कांद्याला २०० ते ५०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. आज ७२३ क्विंटल कांदा बाजारात आला. अडत बाजारात १०० ते ७०० रुपयांदरम्यान कांदा विक्री झाला. टोमॅटो, दुधीभोपळा, पत्ताकोबी, फुलकोबीचे ढीगचे ढीग अडत दुकानांसमोर पडलेले बघण्यास मिळत आहेत. 

परराज्यातील कांद्याने भाव पडले अडत व्यापाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह आता मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांतही कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. यामुळे कांद्याचा गड मानल्या जाणाऱ्या लासलगाव, नाशिक येथील कांद्याला परराज्यातून उठाव कमी झाला. परिणामी, कांद्याची स्थानिक बाजारात आवक वाढली आहे. दररोज ८० टनपेक्षा अधिक कांदा बाजारात येत असल्याने भाव गडगडले. मंगळवारी १०० ते ७०० रुपये क्विंटलदरम्यान कांदा विकला गेला. 

बटाट्याची २०० टन आवक बटाट्याचे अडत व्यापारी मुजीब खान म्हणाले की, डिसेंबर महिन्यात इंदूरच्या नवीन बटाट्याची आवक सुरू होणार आहे. सध्या इंदूर व आग्रा येथील शीतगृहात मोठ्या प्रमाणात बटाट्याचा साठा पडून आहे. करार संपुष्टात आल्याने शीतगृह मालकांनी जुना बटाटा बाहेर काढण्यास सांगितले आहे. परिणामी, बटाटा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणला जात आहे. जाधववाडीत आज २०० टन बटाट्याची आवक झाली व ६०० ते ८०० क्विंटलदरम्यान बटाटा विक्री झाला. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजारvegetableभाज्याAurangabadऔरंगाबाद