शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

स्कूल बसमुळे शाळकरी मुलाचा पाय निकामी; बसमध्ये घेण्याऐवजी पायावरून घातले चाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:40 IST

स्कूल बसचालकाच्या चुकीमुळे पंधरावर्षीय विद्यार्थ्याचा उजवा पाय निकामी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता गांधेलीजवळ घडली.

औरंगाबाद : स्कूल बसचालकाच्या चुकीमुळे पंधरावर्षीय विद्यार्थ्याचा उजवा पाय निकामी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता गांधेलीजवळ घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.ओम भाऊसाहेब वाघ (१५, रा. आडगाव बु., ता. औरंगाबाद) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात इयत्ता नवव्या वर्गात शिकत आहे. बसचालक आरोपीचे नाव नवनाथ भुजंगराव घोडके (४०, रा. एकोड-पाचोड) असे आहे. 

चालकाने विद्यार्थ्याला रस्त्यावरील शेळ्या हाकलण्यासाठी खाली उतरविले आणि नंतर तो बसमध्ये चढत असतानाच बस पुढे घेतली. त्यावेळी रस्त्यावर कोसळलेल्या विद्यार्थ्याच्या पायावरून चाक गेले. भाऊसाहेब कारभारी वाघ (३७, रा. आडगाव बु.) यांचा मुलगा ओम झाल्टा येथील शिवछत्रपती विद्यालयात दोन वर्षापासून शिकतो. तो नियमित स्कूल बसने ये-जा करतो. गावातील इतर विद्यार्थीही त्याच्यासोबत असतात.

२३ आॅगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता स्कूल बस (क्र. एमएच-२० ईएफ २६९६) विद्यार्थ्यांना घेऊन आडगाव येथून निघाली. बस सकाळी सात वाजता गांधेली रोडने झाल्टा येथे जात होती. गांधेलीजवळ बससमोर शेळ्या आल्या. त्यामुळे चालक नवनाथ घोडके याने ओम याला खाली उतरून शेळ्या हाकलण्यास सांगितले. ओमनेही खाली उतरून शेळ्या हाकलल्या. त्यानंतर तो बसमध्ये चढत असताना चालकाने लगेच बस पुढे घेतली. त्यामुळे हेलपाटून ओम खाली कोसळला. विशेष म्हणजे लगेच एक चाक ओमच्या पायावरून गेले. यात त्याच्या पायाचा चुराडा झाला.

मुलासाठी केअर टेकर नाहीया शाळेत परिसरातील विविध गावचे विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेने करार करून खासगी बस भाड्याने लावल्या आहेत. पण, शाळेने बसमध्ये केअर टेकर ठेवलेला नाही. शिवछत्रपती विद्यालयाचा हा निष्काळजीपणा एका विद्यार्थ्याला आयुष्यभरासाठी जखमी करून गेला. विशेष म्हणजे त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने कुठलीही माणुसकी दाखविली नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. 

जखमीला रस्त्यावर सोडलेया स्कूल बसमध्ये ओमसह त्याची चुलत बहीणदेखील होती. अपघातानंतर चालक घोडके याने दोघांना तेथे सोडून दवाखान्यास जाण्यास सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नातेवाईकांना फोन करून अपघाताची माहिती दिली. भाऊसाहेब वाघ यांनी तात्काळ गांधेली येथे धाव घेऊन ओम याला बीड बायपासवरील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी लाखो रुपये खर्च सांगितला आहे.

कारवाई केली जाईलशाळेचे मुख्याध्यापक आणि स्कूल बस मालक, चालक यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. केअर टेकर ठेवणे शाळेची जबाबदारी असते. चालकानेही विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घातला आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. गुन्हा दाखल असून त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल.- सत्यजित ताईतवाले (सहायक पोलीस निरीक्षक चिकलठाणा)

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थी