शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पुन्हा हादरले; पती-पत्नीची निर्घृण हत्या, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 12:44 IST

घटनेपासून मुलगा फरार असून त्या दृष्टीने पोलीस तापस करत आहेत.

औरंगाबाद : शहरातील पुंडलिक नगर येथे आज सकाळी घरात दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्याची हत्या केल्यानंतर आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी शहरात एका तरुणीची एकतर्फी प्रेमातून चाकूने भोसकून खून केल्याची घटना ताजी असतानाच दांपत्याच्या हत्येची घटना पुढे आल्याने शहर पुन्हा हादरून गेले आहे. भांडे व्यापारी शामसुंदर  हिरालाल कलंत्री ( ५५) आणि  किरण शामसुंदर कलंत्री (४५ ) अशी मृतांची नावे आहेत.  कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह घराबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कलंत्री यांच्या घराला कुलूप आहे आणि घरामधून दुर्गंधी येत असल्याची माहिती सविता सातपुते यांना पोलिसांना  कळवली. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवल्याचे यावेळी निदर्शनास आले. दरम्यान, मुलगा आकाश या घटनेपासून फरार असून त्याचा मोबाईल बंद येत आहे. याशिवाय मुलाने एसबी महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या बहिणीला शनिवारी धुळ्याच्या नातेवाईकांचा अपघात झाला आहे आम्ही तिकडे जात आहोत, तू मावशी सविताकडे जा, असे सांगितले. यानंतर मुलगी तिच्या काकाकडे गेली ही माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिसांचा तपास या दृष्टीने सुरू आहे. मात्र, शहरात लागोपाठ होणाऱ्या हत्यांचे सत्र चिंताजनक ठरत आहे.

कुलूप पाहून मुलगी परतली आई वडिलांचा मोबाईल बंद लागत असल्यामुळे चिंतेने काल दुपारी  मुलगी घरी परतली होती. मात्र दाराला कुलूप असल्याने सविता सातपुते या ओळखीच्या मानलेल्या मावशीच्या घरी राहिली. आज सकाळी ती पुन्हा घरी आली तेव्हा घरातून दुर्गंधी येत होती. यामुळे संविता यांनी पोलिसांना घटना कळविली, पोलिसांनी दार तोडून आत जाऊन पाहिले असता घटना उघडकीस आली.

मुलाने शेजाऱ्याकडून नेले 2 हजार रुपयेआकाश हा रविवारी सकाळी 8 वाजता कॉलनीत आला होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या योगेश नाशिककर यांच्याकडून त्याने 2 हजार रुपये नेल्याचे समोर आले. मयताच्या फोनवरून कॉलकरून आकाशला 2 हजार रुपये द्या असे योगेश यांना सांगण्यात आले. मात्र, तो आवाज मयत कलंत्री यांचा नव्हता असे योगेश यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू