शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हायवा ट्रक पळविणारी आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 19:23 IST

या टोळीतील गुजरातमधील चारही आरोपींविरुद्ध वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात चोरीच्या वाहनांचे सर्व भाग वेगवेगळे केले जातात. धुळे जिल्ह्यात तसेच पंजाबमध्ये वाहनांची विक्री

औरंगाबाद : हायवा ट्रक पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गुजरातमधून अटक केली. अटकेतील सहा आरोपींकडून चोरीचा हायवा ट्रक, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन कार, मोबाईल आणि रोकड, असा सुमारे ३४ लाखांचा ऐवज जप्त केला.

अब्दुल कलाम महंमद इस्लाम चौधरी (४०, रा. उडसाई, मेहेदराव, उत्तर प्रदेश, ह. मु. संग्रामपूर, गुजरात), दिवाकर ऊर्फ छोटू एकनाथ चव्हाण, शुबनेसकुमार दिनेशकुमार भाटिया (रा. गुजरात), मोहम्मद इस्तिखान मोहम्मद सफार खान (रा. गुजरात), शिवाजी अशोक लहिरे (रा. वांजरगाव, ता. वैजापूर) आणि त्याचा मेहुणा पिंटू ऊर्फ महेश भगवान बिरुटे ऊर्फ कहार (रा. अमरधाम, ता. नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १ जानेवारी रोजी संतोष सुखदेव बोरुडे (रा. डव्हाळा, ता. वैजापूर) यांचा हायवा चोरट्यांनी पळविला होता. अशाच घटना शेजारील जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडल्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शेजारील विविध ठिकाणी वाहन चोरीसाठी चोरट्यांनी वापरलेली पद्धत जाणून घेतली.

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा संशयावरून शिवाजी लहिरे याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याचा मेहुणा पिंटू ऊर्फ महेश आणि गुजरातमधील अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून त्याने ट्रक चोरून नाशिक येथे नेल्याचे सांगितले. नंतर हा हायवा कलामने साथीदारांसह धुळे जिल्ह्यात नेल्याचे समजले. पोलिसांनी कलाम, दिवाकर ऊर्फ छोटू, शुबनेसकुमार, मोहम्मद इस्तिखान यांना सुरतमधील इच्छापूर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, औरंगाबादसह देशभरातील विविध राज्यांमध्ये ते वाहन चोरी करतात आणि धुळे जिल्ह्यात तसेच पंजाबमध्ये विक्री करतात. धुळे जिल्ह्यात चोरीच्या वाहनांचे सर्व भाग वेगवेगळे केले जातात. यानंतर बऱ्याचदा हायवाच्या चेसीस आणि इंजिन क्रमांक बदलून नवीन क्रमांक टाकून बनावट कागदपत्रांच्या आधारे हायवा ट्रक पंजाब, हरियाणा राज्यांत कमी भावाने विक्री करतात. या टोळीने पंजाबमध्ये विक्री करण्यासाठी तयार केलेला बनावट चेसीस क्रमांक असलेला ट्रक पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला. तर असेच अन्य दोन हायवा पंजाबमधील दिनानगर गावात उभे असल्याचे सांगितले. या टोळीतील गुजरातमधील चारही आरोपींविरुद्ध वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कामगिरीही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळुंके, भगतसिंग दुलत, कर्मचारी विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, श्रीमंत भालेराव, सुनील खरात, राजेंद्र जोशी, किरण गोरे, रमेश अपसनवाड, वाल्मीक निकम, योगेश तरमाळे, ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर धापसे, गणेश गांगवे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस