शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Aurangabad Violence : औरंगाबाद दंगलीची आठ दिवसांपूर्वी पडली ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 1:23 AM

शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भागातच महापालिकेने कारवाईचे ठिकाण का निवडले...? दोन राजकीय पक्षांच्या वादाचा भडका कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे माहीत असतानाही पोलिसांनी डोळे मिटले होते. त्यामुळे औरंगाबादकरांना जातीय दंगल पाहावी लागली. दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

औरंगाबाद : शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भागातच महापालिकेने कारवाईचे ठिकाण का निवडले...? दोन राजकीय पक्षांच्या वादाचा भडका कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे माहीत असतानाही पोलिसांनी डोळे मिटले होते. त्यामुळे औरंगाबादकरांना जातीय दंगल पाहावी लागली. दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.शहागंज चमनच्या चारही बाजूने अतिक्रमणे अनेक वर्षांपासून आहेत. येथे हातगाड्या लावणाºयांचे साहित्य फेकून देणे, त्यांना मारहाण करण्याचे काम शिवसेनेच्या लच्छू पहेलवान यांनी केले. प्रतिउत्तरात एमआयएमने कडाडून विरोध दर्शवित सिटीचौैक पोलीस ठाण्यात पहेलवान यांच्यावर कारवाई करावी म्हणून ठिय्या आंदोलनही केले. शहागंज चमनमधील टपºया उठविण्याची मागणी लच्छू पहेलवान यांनी केली. मनपाचे अतिक्रमण हटाव पथक तेथे पोहोचल्यावर विरोधी पक्षनेता फिरोज खान, नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेने अनधिकृत नळ कापण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी महापालिकेने वादग्रस्त मोतीकारंजा या परिसराची निवड केली. येथील मेन लाईनवरील ४० नळ कापण्यात आले. शुक्रवारी रात्री दहा नळ कनेक्शन कापले. एका मंदिराचे नळ कापण्याच्या मुद्यावरून रात्री ९ वाजता वाद उकरून काढण्यात आला. दोन गट आमने सामने आले. पाहता पाहता जाळपोळ सुरू झाली. यानंतर रात्री उशिरा शिवसेना आणि एमआयएम समोरासमोर आले. रात्री बारा वाजता तर शहागंज, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज चमन, गुलमंडी आदी भागात जाळपोळ, दगफडेक सत्र सुरू झाले.पोलीस यंत्रणा अपयशीशहागंज येथील अतिक्रमणावरून दोन गटांत वारंवार तेढ निर्माण होत असतानाही पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही. या ठिणगीचा कोणत्याही क्षणी भडका होऊ शकतो, याची जाणीव पोलिसांना नव्हती का? पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेलाही याचा थांगपत्ता लागू नये म्हणजे आश्चर्य म्हणावे लागेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार