शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथील बेशिस्त वाहतुकीला लागणार वेसण; दोन स्वतंत्र पोलीस चौक्या होणार सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 4:18 PM

रेल्वेस्टेशन येथील बेशिस्त रिक्षाचालक, विस्कळीत पार्किंग आणि मनमानी हॉकर्संना पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी शिस्तीचा डोस दिला.

ठळक मुद्देस्टेशनवर उस्मानपुरा आणि वाहतूक पोलिसांची स्वतंत्र चौकी सुरू करण्याचे पोलीस उपायुक्तांचे आदेश

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन येथील बेशिस्त रिक्षाचालक, विस्कळीत पार्किंग आणि मनमानी हॉकर्संना गुरुवारी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी शिस्तीचा डोस दिला. यापुढे शिस्त मोडाल तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत त्यांनी स्टेशनवर उस्मानपुरा आणि वाहतूक पोलिसांची स्वतंत्र चौकी सुरू करण्याचे आदेश दिले.

रेल्वेस्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांचा धुमाकू ळ दिसतो. रिक्षाचालक स्टेशनमध्ये घुसून प्रवाशांच्या बॅगा हातात घेऊन त्यांना बळजबरीने रिक्षात बसण्यासाठी आग्रह करतात. मनमानी पद्धतीने भाडे आकारणे, प्रवाशांसोबत वाद घालणे हे नित्याचेच झाले. तेथे दुचाकी आणि चारचाकी वाहन पार्किंगमध्ये बेशिस्तरीत्या वाहने उभी असतात. स्टेशनच्या प्रवेशद्वारावर हॉकर्सने बस्तान मांडल्याने वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त ढाकणे यांनी आज स्टेशनची पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, निरीक्षक मुकुंद देशमुख, अनिल आडे, घोडके  उपस्थिती होते. 

आयुक्तांकडूनही पाहणीपोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री बारा वाजेनंतर अचानक रेल्वेस्टेशनला भेट देऊन पाहणी केली. तेथील विदारक चित्र पाहून त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले.

रिक्षा प्रवासभाड्याचा फलक लावणारएवढेच नव्हे तर मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारतात. स्टॅण्डवर रांगेत थांबून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हवे त्या ठिकाणी नेऊ न सोडणे रिक्षाचालकाचे कर्तव्य आहे. जास्त पैसे देणाऱ्या प्रवाशालाच ते रिक्षातून नेण्यास तयार होतात. परिणामी, प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजून प्रवास करावा लागतो अथवा विविध रिक्षाचालकांना विनंती क रावी लागते. ही बाब लक्षात घेऊन रिक्षाचा किफातशीर प्रवासभाडे फलक रेल्वेस्टेशनवर लावण्यात येणार आहे.- विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनTrafficवाहतूक कोंडी