औरंगाबाद स्थानकावरच रेल्वेत उडाली ठिणगी ?
By Admin | Updated: October 28, 2014 01:02 IST2014-10-28T00:46:01+5:302014-10-28T01:02:17+5:30
औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला शनिवारी मध्यरात्री लागलेली आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याविषयी अनेक तर्क लढविले जात आहेत;

औरंगाबाद स्थानकावरच रेल्वेत उडाली ठिणगी ?
औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला शनिवारी मध्यरात्री लागलेली आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याविषयी अनेक तर्क लढविले जात आहेत; परंतु औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून रवाना झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी बोगीला भीषण आग लागली. यामुळे औरंगाबाद रेल्वेस्थानकावरच आग लागण्यास सुरुवात झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
औरंगाबाद रेल्वेस्थानकावर विशेषत: रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या रवाना होताना फोकसच्या मदतीने ब्रेक लायनर जॅम झाल्याने चाकाजवळ ठिणग्या उडत आहेत का, याची पाहणी केली जात असते. असा प्रकार दिसून आल्यावर वेळीच योग्य ती दक्षता घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पॅसेंजर गाडीत नेहमी चोरट्यांचा उपद्रव सुरू असतो. त्यामुळे तांत्रिक दोषांपेक्षा आगीच्या घटनेला चोरट्यांची खोडी कारणीभूत असू शकते. शेगडीवर शेंगा भाजण्याचा प्रकार, विडी-सिगारेट बोगीतच फेकण्याचा प्रकार त्यांच्याकडून होऊ शकतो. सर्वसामान्य प्रवासी फटाके, ज्वालाग्रही पदार्थ सोबत नेतात; परंतु तेही सुरक्षितरीत्या नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आगीचे कारण नेमके स्पष्ट होण्यास फॉरेन्सिकच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या घटनेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून ही गाडी रवाना झाल्यानंतर अवघ्या चार कि.मी.च्या अंतरावर बोगीला भीषण आग लागली. त्यामुळे आगीची सुरुवात औरंगाबाद रेल्वेस्थानकावर झाली, अशी शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद स्थानकाहून रवाना झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी बर्निंग ट्रेनची ही घटना घडली. तांत्रिक दोषांऐवजी ही घटना कशाने घडली हे महत्त्वाचे आहेच; परंतु त्यापेक्षा तर सदर प्रकारास कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीचा विचार मॉडेल रेल्वेस्थानकावरच आगीची परिस्थिती निर्माण करण्याचा हेतू होता, असाही कयास बांधला जात आहे.
देखभाल महत्त्वाची
४रेल्वेगाड्यांची देखभाल, दुरुस्ती महत्त्वाची आहे. त्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. रेल्वेस्थानकावर ब्रेक लायनरमधून ठिणग्या उडत आहेत का ? याची रात्रीच्या वेळी पाहणी केली जाते. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर या रेल्वेची योग्य पद्धतीने पाहणी करण्याची गरज होती, असे रेल्वे प्रवासी सेनेचे राज सोमाणी यांनी म्हटले.