शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद रेल्वे स्कॉडला डॉगची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:07 IST

राजेश भिसे । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : रेल्वे पोलिसांच्या डॉग स्कॉडमध्ये असलेला ‘सॅण्डी’ तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाला; पण ...

ठळक मुद्देशहर पोलीस स्कॉडवर भिस्त : तीन महिन्यांपूर्वी स्कॉडमधील ‘सॅण्डी’ सेवानिवृत्त

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वेपोलिसांच्या डॉग स्कॉडमध्ये असलेला ‘सॅण्डी’ तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाला; पण त्याच्या जागेवर दुसरा डॉग अद्याप रेल्वे पोलीस दलास मिळालेला नाही, त्यामुळे रेल्वेस्थानक व रेल्वेतील संशयास्पद हालचाली वा संशयास्पद वस्तूंवर नजर ठेवण्यासाठी शहर पोलिसांच्या डॉग स्कॉडवर भिस्त आहे.औरंगाबाद रेल्वे पोलीस दलासाठी एक डॉग स्कॉड कार्यरत होते. यात ‘स्निपर सॅण्डी’ हा डॉग आणि दोन हॅण्डलर कार्यरत होते. गुडस् टर्मिनल, यार्ड, टू व्हिलर, फोर व्हिलर पार्किंग, तिकीट खिडकी, स्थानक, रेल्वे डबे आणि संशयास्पद वस्तूंवर नजर ठेवण्यासाठी हे स्कॉड काम करीत होते. आयुर्मानानुसार दर दहा वर्षांनी स्कॉडमधील डॉग सेवानिवृत्त होतो. त्याप्रमाणे तीन महिन्यांपूर्वी ‘सॅण्डी’ सेवानिवृत्त झाला. त्याला परंपरेप्रमाणे रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निरोप दिला. नव्या पाहुण्याच्या आगमनाची प्रतीक्षा रेल्वे पोलिसांना लागून राहिली. काही दिवस प्रतीक्षा केल्यानंतर रेल्वे पोलीस मुख्यालयाशी पत्रव्यवहार व पाठपुरावाही करण्यात आला; पण अद्याप या प्रयत्नांना यश मिळाले नसल्याचे दिसून येते. डॉग स्कॉडमध्ये एक डॉग आणि दोन कॉन्स्टेबल हॅण्डलर म्हणून कार्यरत होते. सॅण्डी सेवानिवृत्त झाल्यानंतर एका हॅण्डलरची बदली करण्यात आली, तर दुसºयास इतर विभागातील काम देण्यात आले. सध्या शहर पोलिसांच्या डॉग स्कॉडवरच रेल्वे पोलिसांची भिस्त असून, रेल्वे पोलीस मुख्यालयातील उच्च पदस्थ अधिकाºयांनी स्कॉडसाठी डॉग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.दोन डॉग स्कॉडची गरजऔरंगाबद रेल्वेस्थानक तसे संवेदनशील स्थानक म्हणून ओळखले जाते. अनेक लांब पल्ल्यांच्या वा सुपर एक्स्प्रेस रेल्वेही येथून जातात आणि येतात. प्रवाशांची वर्दळ व इतर संभाव्य घटनांच्या पार्श्वभूमीवर येथे रेल्वे पोलिसांना दोन डॉग स्कॉडची गरज आहे. ते मिळाल्यास संभाव्य घातपाताच्या घटना टळू शकतील.स्कॉडमधील डॉगसाठी विशेष व्यवस्था४रेल्वे पोलिसांच्या कार्यालयाशेजारीच डॉग स्कॉडसाठी विशेष रूम्स तयार करण्यात आलेल्या आहेत. दोन डॉगसाठी दोन खोल्या आणि हॅण्डलर्ससाठी दोन खोल्या तयार करण्यात आल्या. पैकी एका खोलीत ‘सॅण्डी’ राहत होता. तो निवृत्त झाल्याने ही रूम आणि हॅण्डलर्ससाठीच्या दोन्ही खोल्याही रिक्तच आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसdogकुत्रा