औरंगाबाद मनपाला पदोन्नती!
By Admin | Updated: September 2, 2014 01:55 IST2014-09-02T01:46:03+5:302014-09-02T01:55:45+5:30
औरंगाबाद : महापालिकेची ७ वर्षांची मेहनत फळाला आली असून, शासनाने पालिकेला ‘ड’ मधून ‘क’ वर्गात पदोन्नती दिली आहे. आज सायंकाळी शासनाने राज्यातील ९ पालिकांसह औरंगाबाद

औरंगाबाद मनपाला पदोन्नती!
औरंगाबाद : महापालिकेची ७ वर्षांची मेहनत फळाला आली असून, शासनाने पालिकेला ‘ड’ मधून ‘क’ वर्गात पदोन्नती दिली आहे. आज सायंकाळी शासनाने राज्यातील ९ पालिकांसह औरंगाबाद मनपाला पदोन्नती दिल्याचे परिपत्रक जारी केले आहे. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, दरडोई उत्पन्नाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांचा वर्ग बदलला जातो. पालिकेची वर्गवारी बदलल्यानंतर होणाऱ्या फायद्या-तोट्यांबाबत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, याबाबत शासनाने अजून काही कळविले नाही. येत्या आठवड्यात सर्व माहिती समोर येईल.
मागील दीड महिन्यापासून पालिका ‘क’ वर्गात यावी, यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू होत्या. २०११ साली झालेली जनगणना, २०१५ साली होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रभाग रचनेमुळे पालिकेचा वर्ग बदलण्याबाबत शासनस्तरावर निर्णयासाठी चर्चेच्या फैरी सुरू होत्या. शहराचा विस्तार वाढला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांनी शहर वाढले आहे. त्या तुलनेत लोकसंख्यादेखील वाढली आहे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार शहरातील ९९ वॉर्डांची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी झाली आहे.
‘ड’ वर्गातून मनपा ‘क’ वर्गात आल्यास पालिकेला काही फायदे होणार आहेत. कर्मचारी भरतीची व काही वरिष्ठ संवर्गातील पदांची मान्यता मिळेल. आयुक्त हे पद सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचे होईल. मनपाचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने हद्दवाढ व मालमत्तांची पुन्हा पाहणी केली जाऊ शकते.
१४०० कोटींची कामे मनपाद्वारे सुरू आहेत. त्याचे मॉनिटरिंग करण्यासाठी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची जादा पदे मिळतात. गेल्या आठवड्यातच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त मनपाला मिळाले आहेत. त्याच दिवशी पालिका ‘क’ वर्गात आल्याचे स्पष्ट झाले होते. 1
पालिकेला वित्त आयोगातून निधी मिळणार नाही. ‘ड’ वर्गातील मनपा व नगरपालिकांनाच निधी मिळतो. आता मनपाला स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतील. 2
प्रशासकीय खर्चात वाढ होऊ शकते. प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवावे लागेल. शासकीय अनुदानाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.