औरंगाबाद : पिस्तूल गहाळप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:14 IST2018-01-19T00:14:22+5:302018-01-19T00:14:27+5:30
उच्च न्यायालयाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असताना दारूच्या नशेत पिस्तूल गहाळ झाल्याची तक्रार नोंदविणारा पोलीस कॉन्स्टेबल अमित स्वामी यास पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस खात्यातून बडतर्फ केले. ही कारवाई टाळण्यासाठी स्वामीने मंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांवर दबाव आणला होता, हे विशेष.

औरंगाबाद : पिस्तूल गहाळप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बडतर्फ
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असताना दारूच्या नशेत पिस्तूल गहाळ झाल्याची तक्रार नोंदविणारा पोलीस कॉन्स्टेबल अमित स्वामी यास पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस खात्यातून बडतर्फ केले. ही कारवाई टाळण्यासाठी स्वामीने मंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांवर दबाव आणला होता, हे विशेष.
६ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली तेव्हा अमित नशेत तर्रर्र होता. तत्पूर्वी भोईवाड्यातील घरातून सामान घेऊन अमित हनुमाननगरातील नव्याने भाड्याने घेतलेल्या खोलीकडे मित्राच्या रिक्षातून निघाला होता. तत्पूर्वी तिघांनी दारू पीत असताना पिस्तूलसोबत सेल्फीही काढली. रात्री १०.४० वाजेच्या सुमारास हनुमाननगरकडे जात असताना अमित रिक्षातच झोपला. आवाज देऊनही तो उठत नव्हता. त्याच्या मित्रांना हनुमाननगरमधील खोली माहीत नव्हती. त्यामुळे अर्ध्या रस्त्यातून ते परत भोईवाड्याकडे निघाले. आकाशवाणी चौकात त्यांच्या रिक्षाला अपघात झाला. त्यानंतर पिस्तूल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे अमितच्या निदर्शनास आले.
या घटनेनंतर दुसºया दिवशी पोलीस आयुक्तांनी अमितला निलंबित केले. पिस्तूल आणि दहा राऊंडचा शोध जवाहरनगर आणि गुन्हेशाखा घेत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्तांनी अमितला पोलीस खात्यातून बडतर्फ केले. या कारवाईची माहिती पोलीस आयुक्तांनीच दिली.