औरंगाबाद नांदर बससेवा सुरू, प्रवाशांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST2021-07-18T04:04:47+5:302021-07-18T04:04:47+5:30
कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यातच खेड्यापाड्यातील बससेवा बंद करण्यात आल्या. कोरोनाचे सावट कमी होऊनदेखील अद्यापही बससेवा पूर्ववत झालेली ...

औरंगाबाद नांदर बससेवा सुरू, प्रवाशांकडून स्वागत
कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यातच खेड्यापाड्यातील बससेवा बंद करण्यात आल्या. कोरोनाचे सावट कमी होऊनदेखील अद्यापही बससेवा पूर्ववत झालेली नाही. यासंदर्भात गावकऱ्यांकडून नांदर ते औरंगाबाद ही मुक्कामी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद अखेर ही बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यावेळी चालक अशोक थोरात व वाहक श्रीधनराज थोरे यांचा सत्कार करण्यात आला. ही बस नांदरमार्गे सकाळी पाच वाजता दावरवाडी फाटा, नानेगाव, खेर्डा, बालागनगर, कापूसवाडी, ढोरकीन या मार्गे औरंगाबाद येथे पोहचेल, तर सायंकाळी हीच बस पुन्हा औरंगाबाद मुख्य बसस्थानकातून नांदरला मुक्कामी येणार आहे. यावेळी सरपंच ॲड. किशोर वैद्य, ताराचंद सोनवणे, नामदेव खरात, माउली काळे, भगवान जाधव, किशोर काळे, परमेश्वर शिंदे, विष्णुपंत वाघमारे, रऊफ पठाण यांनी बसचे स्वागत केले.
170721\img-20210715-wa0021.jpg
औरंगाबाद नांदर बससेवा पुर्ववत सुरू झाल्याने नांदर नांगरिकांकडून चालक वाहकाचे स्वागत करण्यात आले.