शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नारेगावप्रश्नी औरंगाबाद मनपा सर्वोच्च न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:35 PM

नारेगाव कचरा डेपोवर महापालिकेने अजिबात कचरा टाकू नये, असा आदेश मंगळवारी खंडपीठाने दिला. या निर्णयाला त्वरित सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा एकमुखी निर्णय बुधवारी महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने घेतला.

ठळक मुद्देकचराकोंडीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सुमारे साडेचार तास नगरसेवकांनी कचर्‍याच्या प्रश्नावर मंथने केले. प्रशासनाने आपली भूमिका विशद करावी, अशी मागणी राजू शिंदे यांनी केली.

औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोवर महापालिकेने अजिबात कचरा टाकू नये, असा आदेश मंगळवारी खंडपीठाने दिला. या निर्णयाला त्वरित सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा एकमुखी निर्णय बुधवारी महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने घेतला. कचर्‍यावर प्रक्रिया करणारी सर्वोच्च यंत्रणा आणीबाणी कायद्यांतर्गत अथवा अल्पनिविदा काढून युद्धपातळीवर खरेदी करावी. स्वत: कचरा जिरविणार्‍या सोसायट्यांना मालमत्ता करात १ टक्कासूट देण्याचा ठरावही महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंजूर केला.

कचराकोंडीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सुमारे साडेचार तास नगरसेवकांनी कचर्‍याच्या प्रश्नावर मंथने केले. प्रशासनाने आपली भूमिका विशद करावी, अशी मागणी राजू शिंदे यांनी केली. आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी मागील तीन महिन्यांत प्रशासनाने कोणकोणते प्रयत्न केले याविषयीची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. पर्यायी जागांसाठी प्रशासन कशा पद्धतीने जंगजंग पछाडत फिरत होते, हे त्यांनी सांगितले. राजू शिंदे यांनी शहरातील ११५ वॉर्डांमध्ये कचर्‍याचे वर्गीकरण करा. ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती आपल्या वॉर्डात सुरू आहे. यातून उत्पन्न देणारा आपला वॉर्ड असेल, असेही त्यांनी सांगितले. ७० टक्के नागरिक वर्गीकरण करीत आहेत. वर्गीकरण न करणार्‍यांना आणि कुठेही कचरा टाकणार्‍यांना दंड लावा, अशी मागणी शिल्पाराणी वाडकर यांनी केली. एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी जुन्या शहरातील कचरा २४ तासांत न उचलल्यास आंदोलनाचा इशारा दिला. त्यांच्या या भूमिकला नगरसेवक आणि महापौरांनी कडाडून विरोध केला.

कीर्ती शिंदे, राजू वैद्य यांनी कचर्‍यावर त्वरित प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. रावसाहेब आमले यांनी दौलताबाद किल्ल्याजवळ मनपाला कचरा टाकायची परवानगी कोणी दिली? याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाने त्यावर खुलासा दिला नाही. राज वानखेडे यांनी जुन्या शहराने सिडको-हडकोचा आदर्श घ्यावा, अशी कोपरखळी एमआयएम नगरसेवकांना मारली. यावेळी आयुक्तांनी मध्येच शहरातील कचरा दोन ते तीन दिवसांत उचलण्याची ग्वाही दिली. शहरात राजरोसपणे कॅरिबॅग विक्री सुरू असल्याचे पुरावेच माधुरी अदवंत यांनी सभागृहात दिले. पुंडलिकनगर रोडवर टाकण्यात येणारा कचरा थांबवा, अशी मागणी मीना गायके यांनी केली

चोराप्रमाणे कचरा टाकू नकामहापालिका अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी चोराप्रमाणे कचरा टाकत आहे. आपण आपल्या हक्काच्या जागेवर कचरा टाकतोय, तर राजरोसपणे टाका. नागरिक विरोध करीत असतील, तर त्यांना विश्वासात घ्या असा सल्ला सिद्धांत शिरसाट यांनी दिला. 

कचर्‍यापासून विद्युत निर्मितीचा ठरावपुणे येथील खगा एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनीने स्वखर्चाने कचर्‍यापासून विद्युत निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. मनपा प्रशासनाने बुधवारी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी प्रस्ताव सादर केला. महापौरांनी शासन मान्यतेच्या अधीन राहून मंजुरी दिली. हा प्रकल्प शासनाच्या नियमानुसार आहे की नाही तेही तपासण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. 

मनपा प्रशासनाने बुधवारी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी खगा एनर्जी प्रा. लि. या कंपनीचा प्रस्ताव सादर केला. कंपनीने शहरात स्वखर्चाने प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. ही कंपनी प्रकल्प उभारून कचर्‍यापासून विद्युत निर्मिती करणार आहे. त्यासाठी मनपाने कंपनीला केवळ कचरा द्यायचा. कोणतीही रक्कम मनपाला द्यावी लागणार नाही. प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीस २५ वर्षांसाठी पाच एकर जागा लीजवर द्यावी आणि १.५ एमएलडी पाणी मोफत द्यावे, एवढीच कंपनीची अट आहे. विजेच्या उत्पन्नातील पाच टक्के रक्कम मनपाला देण्याची तयारीही कंपनीने दर्शविली आहे. महापौरांनी हा प्रकल्प नियमानुसार आहे की नाही ते तपासावे तसेच शासनाची मान्यता घ्यावी, अशी अट टाकली. त्यानंतर शासन मान्यतेच्या अधीन राहून या प्रस्तावास मंजुरी दिली.

७४ कोटींच्या डीपीआरला मंजुरीमहाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या इंदोरच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी ७३ कोटी ३६ लाख रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला. बुधवारी सर्वसाधारण सभेत दुरुस्तीसह मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळणार असला तरी महापालिकेला आपला ३० कोटी ५४ लाख रुपयांचा वाटा टाकावा लागणार आहे. यासंदर्भात ९ मार्चला मुंबईत अंतिम बैठक होणार आहे. इको प्रो या संस्थेने तयार केलेला डीपीआर शासनाला सादर केला आहे. यात २५ कॉम्पॅक्टर, १३२ रिक्षा तसेच ५० कोटींचे प्रोसेसिंग युनिट अशा कामांचा समावेश आहे. पुढील दहा वर्षांतील कचर्‍याची वाढ गृहीत धरून डीपीआर तयार केला असल्याचे कंपनीचे कर्मचारी जावेद वारसी यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले. ७३ कोटींत केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा राहणार असला तरी महापालिकेला ३० कोटींचा वाटा कसा टाकावा हा प्रश्न भेडसावत आहे.

काही ठराव - - स्वत: कचरा जिरविणार्‍यांना मालमत्ता करात सूट- कॅरिबॅग बंदीचे सक्त आदेश जारी- कचरा प्रक्रियेच्या डीपीआरला सभेची मंजुरी- ४८ तासांत शहरातील कचरा उचलणार- १० हजार डस्टबिन खरेदीस मुभा

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद