शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

औरंगाबाद महापालिका आरक्षण सोडतीत दिग्गजांचे वार्ड झाले राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 13:53 IST

एकूण ११५ वार्ड पैकी २२ वार्ड अनुसूचित जाती तर २ वार्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहेत

ठळक मुद्देविद्यमान महापौर व उपमहापौर यांचे वार्ड राखीव

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी ( दि. ३ ) वार्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामुळे विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह अनेक दिग्गज नगरसेवकांचे वार्ड राखीव झाले आहेत. एकूण ११५ वार्ड पैकी २२ वार्ड अनुसूचित जाती तर २ वार्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहेत.   

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-२०२० मध्ये होणे संभाव्य असून, १८ डिसेंबर २०१९ रोजी बहुसदस्यीय प्रभाग पाडून सोडतीचा कार्यक्रम ठरला होता. मात्र राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने बहुसदस्यीय पद्धती रद्द करून पुन्हा एकसदस्यीय वॉर्ड पद्धत लागू करण्याचे निर्णय घेतला. याची आरक्षण सोडत सोमवारी घेण्यात आली. यावेळी विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर विजय औताडे, जेष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांच्यासह अनेक दिग्गजांचे वार्ड राखीव झाले आहेत. 

अनुसूचित जातीसाठी २२ वार्ड आरक्षित वार्ड क्रमांक 8, 12, 16, 23, 29, 40, 50, 52, 58, 70, 77, 84, 87, 96, 101, 105, 110, 112, 113, 114, 115 हे 22 वार्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

अनुसूचित जमातीसाठी २ वार्ड आरक्षित वार्ड क्रमांक 3 एसटी प्रवर्गातील महिलेसाठी तर 13 वार्ड एसटी पुरुषांकरिता आरक्षित करण्यात आले आहेत.

सर्वसाधारण महिला (30 वार्ड राखीव)

1 हर्सूल, 11 जयसिंगपुरा, 56 भवानीनगर, 60 इंदिरा नगर बायजीपुरा पूर्व, 63 आविष्कार कॉलनी, 99 वेदांत नगर, 20 नारेगाव पश्चिम, 21 सावित्रीनगर नारेगाव पूर्व, 39 शताब्दीनगर, 59 बारी कॉलनी, 72 विष्णू नगर, 88 विश्रांती नगर, 89 गजानन नगर, 94 उल्कानगरी, 100 बन्सीलाल नगर, 103 वीटखेडा, 2 भगतसिंग नगर, 14 वानखेडेनगर होनाजीनगर, 25 पवननगर, 28 गणेश कॉलनी, 47 रोशनगेट शरीफ कॉलनी, 61 आत्मशकॉलनी, 64 गुलमोहरकॉलनी, 79 अंबिकानगर, 82 रामनगर, 83 विठ्ठल नगर, 98 कबीरनगर, 32 भडकलगेट, 37 शहाबाजार मकसुत कॉलनी, 106 देवानागरी प्रतापनगर

ओबीसी पुरूष :7 पडेगाव, 10 नंदनवन कॉलनी, 22 चौधरी कॉलनी चिकलठाणा, 30 लोटाकारंजा, 51 औरंगपुरा, 54 सिल्लेखाना, 74 जवाहर कॉलनी, 95 जय विश्वभारती कॉलनी, 104 कांचनवाडी, 109 रामकृष्ण नगर, 85 चिकलठाणा, 76 एन-3 एन-4 पारिजातनगर, 41 शिवनेरी कॉलनी, 27 स्वामी विवेकानंदनगर, 66 अजबनगर कैलासनगर.

ओबीसी महिलासाठी राखीव-४-चेतनानगर,५-पहाडसिंगपूरा-बेगमपूरा, ५३- समर्थनगर, १११-भारतनगर-शिवाजीनगर, ३१- जयभिमनगर,३५-औरंगपूरा, ४३-गणेशनगर, ४४-रहिमानिया काँलनी, ५५-गांधीनगर,६८-पदमपूरा, ७५-विद्यानगर,७८-ज्ञानेश्वरनगर, ९१-न्यायनगर,३४-खडकेश्वर,४९-नवाबपूरा,११२-राहूलनगर.

अनुसूचित जातीसाठी राखीव- प्रभाग क़मांक- ८, १२, १६, १७, २३, २९, ४०, ५०, ५२, ५८, ७०, ७७, ८४, ९६, १०१, १०५, ११०, ११२, ११३, ११४, ११५. यातील महिलांसाठी राखीव एकूण ११ प्रभाग- २९-विश्वासनगर-चेलीपूरा, ५०- मोतीकारंजा-भवानीनगर, १०५- सुधाकरनगर, ११२- वसंत विहार, ११३- गोपीनाथपुरम देवळाई, ११४- सातारागाव-संग़ामनगर,५२-नागेश्वरवाडी,१६-मयूरपार्क, १७- सूरेवाडी, १२-आरेफ काँलनी,८४-कामगार काँलनी

अनुसूचित जमातीसाठी दोन वार्ड राखीव- ३-एकतानगर, १३- रोजेबाग-भारतमातानगर. यापैकी महिला राखीव-एकतानगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक