शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

औरंगाबाद महापालिकेचा असाही विक्रम.... महिलांसाठीच्या पाच शौैचालयांचे बांधकाम तीन वर्षांनंतरही अपूर्ण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:00 PM

शहरातील लाखो महिलांसाठी तीन वर्षांपूर्वी पाच स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू केले. अद्यापपर्यंत हे काम पूर्ण न झाल्याने शनिवारी सर्वसाधारण सभेत संतप्त नगरसेविकांनी मनपा प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले.

ठळक मुद्देनगरसेविकांचा आक्रोश : अफसर सिद्दीकी यांना कारणे दाखवा

औरंगाबाद : शहरातील लाखो महिलांसाठी तीन वर्षांपूर्वी पाच स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू केले. अद्यापपर्यंत हे काम पूर्ण न झाल्याने शनिवारी सर्वसाधारण सभेत संतप्त नगरसेविकांनी मनपा प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपअभियंता अफसर सिद्दीकी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. खुलासा समाधानकारक नसेल तर निलंबन करा, असेही आदेश प्रशासनाला दिले.शनिवारी सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच शिल्पाराणी वाडकर यांनी स्वच्छतागृहांचा मुद्या उपस्थित केला. स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय सभा चालू देणार नाही, अशी ताठर भूमिका सर्व महिलांनी घेतली. सीमा खरात यांनी नगरसेविकांची सभागृहात मोठी संख्या असताना कामे होत नसल्याची लाज वाटते, अशा भावना व्यक्त केल्या. संगीता वाघुले, माधुरी अदवंत यांच्यासह इतरांनी प्रशासनाची कोंडी केली. अफसर सिद्दीकी यांनी खुलासा केला, पण सदस्यांचे समाधान झाले नाही. स्वच्छतागृहांची कामे करता येत नसतील तर राजीनामा द्यावा, अशी मागणी राजेंद्र जंजाळ यांनी केली. प्रशासनाने वाद नसलेल्या जागा आम्हाला द्याव्यात, त्याठिकाणी स्वच्छतागृह उभारून घेऊ, असे राजू वैद्य यांनी सांगितले. सिडको एन-७ येथील महापालिकेच्या शाळेत साडेचारशे विद्यार्थ्यांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याचा आरोप माधुरी अदवंत यांनी केला. विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या पैशांचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी केला असता प्राधिकरणाकडून ८३.५० लाख रुपयांपैकी ५८ लाख ९५ हजारांचा निधी मिळाला आहे. आठ ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले असून, नऊ ठिकाणी काम करण्यात येत आहे, असे सिद्दीकी यांनी सांगितले.--------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWomenमहिला