शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहानुरमियाँ दर्गासमोर महापालिका प्रशासकीय इमारत उभारणार; करार रद्द करून जागा ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 13:03 IST

साडेचार कोटी देऊन महापालिकेने शहानुरमियाँ दर्गासमोरील मार्केट घेतले ताब्यात

औरंगाबाद : शहानुरमियाँ दर्गासमोरील जागा महापालिकेने २०१२ मध्ये बीओटी तत्त्वावर श्रीहरी असोसिएटला दिली होती. या जागेवर महापालिकेची प्रशासकीय इमारत बांधण्याच्या हालचालींना वेग आला असून, मागील आठवड्यात प्रशासनाने तब्बल साडेचार कोटी रुपये देऊन जागा परत घेतली.

दहा वर्षांपूर्वी महापालिकेत बोओटीचे वारे वाहत होते. कोट्यवधी रुपयांच्या जागा बीओटीवर खासगी विकसकांना देण्यात आल्या. त्यातील अनेक प्रकल्प दहा वर्षांनंतरही रखडलेले आहेत. शहानुरमियाँ दर्गासमोरील जागाही श्रीहरी असोसिएटस्ने बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठी घेतली होती. या ठिकाणी युरोपियन मार्केट विकसित करण्याची कल्पना होती. पण, ही कल्पना साकार होऊ शकली नाही. सोमवारचा आठवडी बाजार या जागेत भरविण्यात येत होता. त्याशिवाय खासगी ट्रॅव्हल्सच्या बस उभ्या करण्यासाठी या जागेचा वापर होऊ लागला. विकसकाने ही जागा महापालिकेला परत करावी यासाठी तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी प्रयत्न सुरू केले. अखेर ती जागा विकसकाकडून परत घेण्यात आली तसा ठरावही घेण्यात आला.

महापालिकेचा फायदाच झालाउपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, श्रीहरी असोसिएटस्ला २०१२ मध्ये जागा देण्यात आली होती. दरवर्षी ३० लाख रुपये असोसिएटस्ने भरावे, असे ठरले होते. पण, लिज ॲग्रीमेंट झाले नव्हते. असोसिएटस्ने २०१३ पासून मनपाकडे पैसेच भरले नाहीत. त्यामुळे विकासकाकडून जागा परत मागण्यात आली. विकासकाने त्याला तयारी दर्शविली. त्यानुसार सुमारे ८ कोटी रुपये देऊन जागा परत घेण्याचा निर्णय झाला. त्यातून दरवर्षीच्या थकीत भाड्याचे ३ कोटी ५६ लाख रुपये वळते करून घेतले आणि साडेचार कोटी रुपये विकासकाला देण्यात आले. भविष्यात या ठिकाणी प्रशासकीय इमारत उभारण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाजार मनपा भरविणारमहापालिकेने जागा ताब्यात घेतली असून, या ठिकाणी असलेले वाहनतळ आणि आठवडी बाजार सुरू राहील. वाहनतळाच्या माध्यमातून दरवर्षी १ लाख रुपये, तर आठवडी बाजाराच्या माध्यमातून दरवर्षी १ लाख २० हजार रुपये, असे २ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका