शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत बीड बायपासवर भरधाव जीपने दुचाकीस्वाराला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:34 IST

प्रवेशबंदी सुरू असताना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले.

औरंगाबाद: बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. भगवान गंगाधर शेळके(४५,रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी)असे मृताचे नाव आहे. हा अपघात सहारा सिटीसमोर घडला.  

याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, भगवान शेळके हे  गांधेली शिवारातील सहारा सिटी येथे एका ठेकेदाराकडे पाच महिन्यापासून काम करतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास  मोटारसायकलने कामावर जात होते. सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी ते बायपास ओलांडत असताना जालन्याकडून देवळाईचौकाकडे सुसाट निघालेल्या जीपचालकाने त्यांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, भगवान यांना दुचाकीसह जीपने बायपासवरून सहारा सिटीच्या रस्त्यावर सुमारे शंभर फुट फरफटत नेले. या घटनेत भगवान हे घटनास्थळीच ठार झाले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात जीपचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा