शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत उद्योजक, कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला; तीन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:45 IST

बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारासचा थरार

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी उच्चभ्रू वसाहतीतील घटनाकोयत्याने हल्ला करून हल्लेखोर फरार

औरंगाबाद : उद्योजकाच्या घरात घुसून कुटुंबियांवर खुनी हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३०  वाजेच्या सुमारास जालना रोडलगत रघुवीरनगरात घडली. उद्योजक पती-पत्नीसह १७ वर्षांचा नातू गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यात पारस छाजेड (७८), शशिकला छाजेड (७०), पार्थ आशिष छाजेड (१७) गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

छाजेड कुटुंबातील पाच व्यक्ती या बंगल्यात राहत असून, बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घराची बेल वाजल्याने पारस छाजेड यांनी लोखंडी दार उघडले. हल्लेखोराने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्यावेळी शशिकला छाजेड त्यांच्या मदतीला धावल्या, आरडाओरड ऐकून त्यांचा नातू पार्थ आशिष छाजेड (१७) खोलीतून बाहेर आला. त्याच्यावरही कोयत्याने हल्ला करून हल्लेखोराने तिघांनाही गंभीर जखमी केले. पार्थची आई विधि या वरच्या मजल्यावरील खोलीत होत्या. त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेत मदतीसाठी आरडाओरडा केल्याने नागरिक मदतीला धावले; परंतु अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर अंधारात पळून गेला.

उद्योजक कुटुंबावर प्राणघातक हल्ला कशामुळे केला, याचे कारण समजले नाही. घरातून काय चोरी गेले, याचीही माहिती उशिरापर्यंत समोर आली नव्हती. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. घराबाहेर (पान १ वरून) असलेल्या आशिष छाजेड यांना फोन करून पत्नीने घटनेची माहिती देत घरी बोलविले. त्यांंनी जखमींना खाजगी रुग्णालयात नेले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

सीसीटीव्ही बंदबंगल्यातील सीसीटीव्ही बंद असल्याने बाहेरून कोण आले आणि हल्ला करून पळून गेले, याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले नाही; परंतु रघुवीरनगरातील विविध बंगल्यांसमोर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलीस रात्री उशिरापर्यंत तपासत होते. हल्लेखोर हा जॅकीट घातलेला होता आणि तो दुसऱ्या बंगल्यावर उडी मारून पळून गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घरातील आरडाओरडा ऐकून आजिनाथ बडक हा सुरक्षारक्षक जागी झाला. तो बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खोलीत होता. यावेळी पोलीस उपायुक्त राहुल खाडे, तसेच जिन्सी ठाण्याचे निरीक्षक वसूलकर, गुन्हे शाखेचे राहुल सूर्यतळ घटनास्थळी तातडीने दाखल झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद