शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला वादळी वाऱ्याचा तडाखा; भिंत पडून दोन ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:48 IST

अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर विविध भागांत शेकडो झाडे उन्मळून पडली. 

ठळक मुद्देवाऱ्याच्या वेगामुळे ठिकठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. तब्बल ताशी ५६ किलोमीटर वेगाने वारे वाहिले. या वाऱ्यामुळे भिंत पडून एक महिला ठार झाली. तर दुसऱ्या एका घटनेत भिंत कोसळून आलमगीर कॉलनीतील अबुबकर  शकील मोहंमदी (३) या बालकाचा मृत्यू झाला. अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर विविध भागांत शेकडो झाडे उन्मळून पडली. 

वाऱ्याच्या वेगामुळे ठिकठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली. एन-६ परिसरातील एका घरावर झाड पडल्याची घटना घडली. यावेळी झाड पडल्याने दुचाकीचेही नुकसान झाले. चेतक घोडा चौक परिसरात झाडाची फांदी पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यानंतर पावसाला सुरुवात झाली मात्र, कुठे पावसाचा जोर कमी होता, तर कुठे अधिक. अवघ्या काही मिनिटांत पावसाचा जोर कमी झाला. सिडको, हडको भागात काही ठिकाणी गारा पडल्या. चिकलठाणा वेधशाळेत अवघ्या ०.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. तर ५६ कि.मी. प्रतितास इतका वाऱ्याचा वेग होता. ग्र्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस कॉलनी आणि परिसरातील सुमारे शंभर झाडे सोमवारी सायंकाळी वादळी पावसात जमीनदोस्त झाली.

वाळूज महानगराला झोडपलेवादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. सुमारे पाऊणतास झालेल्या पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

खामखेड्यात वीज पडून महिला ठारऔरंगाबाद तालुक्यातील खामखेडा येथील शेतात वीज पडून  गंगूबाई चतुर भगुरे (६५, रा. फुलंब्री) ही महिला ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. या घटनेत रेणुका ज्ञानेश्वर बंगारे (२४, रा. खामखेडा, ता.औरंगाबाद)ही महिला जखमी झाली असून, घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फुलंब्री येथील गंगाबाई या आपल्या मुलीला भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी खामखेडा येथे आल्या होत्या. सोमवारी  खामखेडा शिवारातील गट क्रमांक १२३ मध्ये वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. याचवेळी महिला आडोशाला जात असताना वीज पडून गंगूबाई  आणि रेणुका ज्ञानेश्वर बंगारे या गंभीर जखमी झाल्या.नातेवाईकांनी त्यांना तात्काळ  फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंगुबार्इंना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रेणुका बंगारे यांना गंभीर इजा झाली असून, त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू