राज्य सिलंबम स्पर्धेत औरंगाबादला ३० पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:31 IST2018-02-23T00:31:21+5:302018-02-23T00:31:38+5:30
पुणे येथे नुकत्याच झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ३० पदकांची लूट केली. ४ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कास्यपदकांचा समावेश आहे. यात कार्तिक डक, राज बारवाल, चैत्रानी ताठे, हेमंत गुळवे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. स्पर्धेत ३८७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

राज्य सिलंबम स्पर्धेत औरंगाबादला ३० पदके
औरंगाबाद : पुणे येथे नुकत्याच झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ३० पदकांची लूट केली. ४ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कास्यपदकांचा समावेश आहे. यात कार्तिक डक, राज बारवाल, चैत्रानी ताठे, हेमंत गुळवे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. स्पर्धेत ३८७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेत विविध वजन व वयोगटांत एकेरी काठी, दुहेरी काठी, तलवार, भाला, दांडपट्टा फिरवणे, स्टिक फाईट हे प्रकार खेळविण्यात आले. पदकविजेते खेळाडू- सुवर्ण- कार्तिक डक, राज बारवाल, चैत्रानी ताठे, हेमंत गुळवे. रौप्यपदक : मनीष चौधरी, ध्रुवेश वैष्णव, भाऊसाहेब घुगे, निकिता बडे, मिजान शेख, ओम सोनवणे, मधुरा झंजाड, ऋतुजा पवार, जान्हवी पाटील, ईश्वर चित्तापुरे, तनिष्क चव्हाण, गायत्री मैड, शिवम राठोड, अजित काथार, तेजस कुटे. कास्यपदक : गौरव पठाडे, तनिष्क करपे, पायल ताठे, वसुधा चौधरी, ओमकार गायकवाड, संकेत पाडळे, स्नेहा हंडाळ, विरम देवरा, हर्ष काळे, अक्षद तारे, कुणाल चव्हाण. पदकविजेत्या खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत धुमाळ, अॅड. रेणुका घुले, जगदीश देसले, सतीश मेटे, पांडुरंग मेटे, सचिव अरुण भोसले, अक्षय सोनवणे, सचिन काळे, अनुप बोराळकर, शिवम दसरे, कुणाल पाटील, सूरज तायडे आदींनी अभिनंदन केले आहे.