शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महावीर जयंतीनिमित्त औरंगाबादेत कचरा, प्लास्टिकमुक्त रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:59 IST

सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे देण्यात आली.

औरंगाबाद : सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे देण्यात आली.

सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष आ़ सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया, कार्याध्यक्ष मुकेश साहुजी, भारती बागरेचा, रमेश घोडके, मिठालाल कांकरिया, भावना सेठिया, अनिल संचेती, करुणा साहुजी, राजेश मुथा, नीलेश पहाडे, जी. एम. बोथरा, डॉ. प्रकाश झांबड आदी उपस्थित होते.

विनोद बोकडिया म्हणाले, महावीर जयंतीच्या दिवशी राजाबाजारातील जैन मंदिरापासून वाहन रॅली काढण्यात येईल. सकाळी ७ वाजता महावीर स्तंभ येथे सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा आणि कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होईल. त्यानंतर उत्तमचंद ठोळे जैन छात्रालय, गुरूगणेशनगर येथे धर्मध्वजारोहण होईल. सकाळी ८ वाजता पैठणगेट ते औरंगपुरा येथील सरस्वती भुवन महाविद्यालय प्रांगणापर्यंत रथयात्रा काढण्यात येईल. कचरा आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने रथयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीवाटप, शीतपेय, आइस्क्रीम आदींमुळे कचरा निर्माण होतो. तो टाळण्यासाठी हे खाद्यपदार्थ बंद करून स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी देण्यात येणार आहे.

रथयात्रेच्या सांगतानंतर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात महाप्रसाद होईल. यावर्षी स्व. डॉ. चंपालालजी देसरडा यांच्या स्मृतीत प्रभादेवी देसरडा, शेखर चंपालाल देसरडा आणि देसरडा कुटुंबीय महाप्रसादाचे लाभार्थी आहेत. सकाळी १० ते २ दरम्यान रक्तदान शिबीर, थालेसेमिया चेकअप शिबीर आणि रोपट्यांचे वाटप होईल. पीरबाजार चौक (उस्मानपुरा), भगवानबाबा आश्रम, मातोश्री वृद्धाश्रम आणि हेडगेवार रुग्णालयात अन्नदान करण्यात येईल.

१०८ कारची रॅलीज्युनिअर सिडको रॉयल जैन ग्रुपतर्फे यावर्षी १०८ कारच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, क्लीन सिटी-ग्रीन सिटी, साक्षरता, वाहतूक व्यवस्थापन, वीज वाचवा, पाणी वाचवा, बेटी बचावो-बेटी पढाओ, जैन धर्माची शिकवण, जैन साधू-संतांची शिकवण आणि भगवान महावीर यांचे सामाजिक, धार्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. ही वाहन रॅली सकाळी ६.०० वा. सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरापासून निघेल आणि भगवान महावीर स्तंभ येथे समारोप होईल.

‘महावीर रसोई घर’गाडीचे लोकार्पणजयंतीनिमित्त महावीर रसोई घरगाडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे रसोई घर ३६५ दिवस घाटी रुग्णालयात रुग्ण आणि गरजूंसाठी अन्नदान करणार आहे. गरजूंसाठी संपूर्ण जेवण मोफत देण्याची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवAurangabadऔरंगाबादRajendra Dardaराजेंद्र दर्डाPlastic banप्लॅस्टिक बंदीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न