शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्याला मिळाला १४३ कोटी ७ लाख रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 18:19 IST

दिवाळीआधीच हा निधी जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

सोयगाव :  शासनाकडून अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १४३ कोटी सात लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी प्राप्त झाला. जिल्ह्यातील तहसीलनिहाय निधी वर्ग करण्याची प्रक्रिया बुधवारी दिवसभर सुरू होती. दिवाळीआधीच हा निधी जाहीर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. 

अतिवृष्टी व पुरामुळे बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र, तसेच जिरायती व आश्वासित सिंचनाखाली नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रतिहेक्टरप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत मदत अनुज्ञेय आहे. या निधीच्या वितरणासाठी तातडीने बाधित क्षेत्र आणि शेतकरी संख्या याप्रमाणे यादी तयार करण्याचे काम सोयगाव तहसील कार्यालयात हाती घेण्यात आले आहे. 

दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षासोयगावचा पहिल्या टप्प्यातील ५० टक्के निधी कपात करण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मदती मिळाली; पण ...खरीप हंगामाच्या प्रारंभी दमदार पाऊस पडल्याने चांगल्या उत्पन्नाची हमी होती. तसे पीक पण आले होते. मात्र अतिवृष्टीमुळे सर्व होत्याचे नव्हते झाले. शासनाकडून तालुका पातळीपर्यत  नुकसानीची मदत मिळाली असली तरी ती अद्यापही हातात नाही. ती किती मिळेल माहीत नाही. मात्र नुकसान त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक झाले आहे. - सोपान पाटील, सोयगाव   

प्रतिहेक्टरी मदत जिराईतसाठी   १००००बागायतीसाठी  २५०००

जिल्ह्यात तहसीलनिहाय मिळालेला पहिल्या टप्प्यातील निधीतहसील कार्यालय     निधीची रक्कम औरंगाबाद    २८८१६४६०० पैठण    ३७२५२८००० फुलंब्री    १०६३२८०० गंगापूर    २७२८६२२५० वैजापूर    ३३९१४१२०० खुलताबाद    ५२०३०६७२ कन्नड    ८६५०८८०० सिल्लोड    १८२४४२७८ सोयगाव    ४३०३५०० अपर तहसील औ.बाद  ३६३८१९००

टॅग्स :FarmerशेतकरीfundsनिधीAurangabadऔरंगाबाद