शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

औरंगाबाद शहर ९० टक्के कचरामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:24 IST

अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार रविवारी ही मुदत संपली. शहर ९० टक्के कचरामुक्त झाले असून, संपूर्ण कचरा उचलण्यात आल्याचा दावा महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने महापौर, उपमहापौरांनी केला.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचा दावा : महास्वच्छता अभियान, नागरिकांनी कचरा टाकू नये

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार रविवारी ही मुदत संपली. शहर ९० टक्के कचरामुक्त झाले असून, संपूर्ण कचरा उचलण्यात आल्याचा दावा महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने महापौर, उपमहापौरांनी केला. नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी नवीन कचरा आणून टाकत आहेत. यानंतर दंडात्मक कारवाईचा बडगा महापालिका उगारणार असल्याचे त्यांनी नमूद केले.मागील ७३ दिवसांपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. कचराकोंडीची वाटचाल आता शंभरीकडे सुरू आहे. कचरा प्रश्नाची दखल पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही घेतली. महापौर घोडेले यांनी त्यांना शब्द दिला होता की, दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. चिकलठाणा आणि हर्सूल येथे सुमारे पंधराशे टन कचरा नेऊन टाकण्यात आला. याशिवाय मध्यवर्ती जकात नाका येथेही कचरा साठवून ठेवला आहे. शहरात ज्याठिकाणी सर्वाधिक मोठे कचºयाचे डोंगर होते ते नाहीसे करण्यात मनपाला यश आले आहे. प्रभाग १, २ आणि ३ मध्ये आजही सर्वाधिक कचरा पडून आहे.रविवारी सकाळी औरंगपुरा येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, नगरसेविका कीर्ती शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, सिकंदर अली यांची प्रमुख उपस्थित होती. औरंगपुरा भाजीमंडई रोडपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिकेच्या वेगवेगळ्या नऊ झोनमध्येही अशाच पद्धतीने मोहीम राबविण्यात आली.मोहीम संपल्यावर पत्रकारांसोबत बोलताना महापौर घोडेले यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून, यापुढे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मनपासोबतच शहरातील प्रत्येक नागरिकांचीही आहे. त्यांनी मनपाला सहकार्य करायला हवे. कुठेही कचरा टाकू नये. अन्यथा मनपाला दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागेल. जोपर्यंत शहराला शिस्त लागणार नाही, तोपर्यंत कचºयाचा प्रश्न संपणार नाही. मनपाने कधीची जबाबदारी झटकलेली नाही. नऊ झोनमध्ये यंत्रणा उभी राहणे, कचºयाचा केंद्रीय प्रकल्प उभा होईपर्यंत ही स्थिती राहिल.या स्थितीतून मार्ग काढण्याचे काम प्रशासन करीतेय असे नमूद केले.व्यापाºयांना सरसकट दंड आकारणारबाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर दररोज रात्री शेकडो टन सुका कचरा पडून असतो. कोणत्याही व्यापाºयाकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. कुंभारवाड्यात तर नागरिकही रस्त्यावरच कचºयाच्या कॅरिबॅग ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाºयांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, दंड लावणाºया पथकाला दररोज दोन लाखांचे उद्दिष्ट देण्यात येईल.टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, गोमटेश मार्केट आदी भागात रात्री १० नंतर कॅरिबॅग, कागदी पुठ्ठे, विविध मालांवरील पातळ कॅरिबॅग रस्त्यावर फेकून देण्यात येते. व्यापाºयांनीच कचरा रस्त्यावर टाकल्यास शहर कसे स्वच्छ होईल, असा प्रश्न मनपा पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दुकानदाराने सुका कचरा ठेवण्यासाठी डसबिन ठेवल्याच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी मनपाच्या घंटागाडीकडे हा कचरा दिला पाहिजे. व्यापाºयांच्या सोयीसाठी दोनवेळा कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही कचरा रस्त्यावर येत असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी नमूद केले.शहरात कचºयाची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत महापालिका शहर सुंदर, स्वच्छ कसे राहील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खीळ बसविण्याचे काम व्यापाºयांकडून होत आहे. व्यापाºयांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दोन हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा निर्णय महापौरांनी घेतला. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने दररोज किमान दोन लाख रुपये दंड वसूल करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. निधी मनपाच्या तिजोरीत आला पाहिजे असेही पदाधिकाºयांनी शेवटी नमूद केले.औरंगाबाद शहर ९० टक्के कचरामुक्तपदाधिकाºयांचा दावा : महास्वच्छता अभियान, नागरिकांनी कचरा टाकू नयेलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार रविवारी ही मुदत संपली. शहर ९० टक्के कचरामुक्त झाले असून, संपूर्ण कचरा उचलण्यात आल्याचा दावा महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने महापौर, उपमहापौरांनी केला. नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी नवीन कचरा आणून टाकत आहेत. यानंतर दंडात्मक कारवाईचा बडगा महापालिका उगारणार असल्याचे त्यांनी नमूद केले.मागील ७३ दिवसांपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. कचराकोंडीची वाटचाल आता शंभरीकडे सुरू आहे. कचरा प्रश्नाची दखल पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही घेतली. महापौर घोडेले यांनी त्यांना शब्द दिला होता की, दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. चिकलठाणा आणि हर्सूल येथे सुमारे पंधराशे टन कचरा नेऊन टाकण्यात आला. याशिवाय मध्यवर्ती जकात नाका येथेही कचरा साठवून ठेवला आहे. शहरात ज्याठिकाणी सर्वाधिक मोठे कचºयाचे डोंगर होते ते नाहीसे करण्यात मनपाला यश आले आहे. प्रभाग १, २ आणि ३ मध्ये आजही सर्वाधिक कचरा पडून आहे.रविवारी सकाळी औरंगपुरा येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, नगरसेविका कीर्ती शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, सिकंदर अली यांची प्रमुख उपस्थित होती. औरंगपुरा भाजीमंडई रोडपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिकेच्या वेगवेगळ्या नऊ झोनमध्येही अशाच पद्धतीने मोहीम राबविण्यात आली.मोहीम संपल्यावर पत्रकारांसोबत बोलताना महापौर घोडेले यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून, यापुढे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मनपासोबतच शहरातील प्रत्येक नागरिकांचीही आहे. त्यांनी मनपाला सहकार्य करायला हवे. कुठेही कचरा टाकू नये. अन्यथा मनपाला दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागेल. जोपर्यंत शहराला शिस्त लागणार नाही, तोपर्यंत कचºयाचा प्रश्न संपणार नाही. मनपाने कधीची जबाबदारी झटकलेली नाही. नऊ झोनमध्ये यंत्रणा उभी राहणे, कचºयाचा केंद्रीय प्रकल्प उभा होईपर्यंत ही स्थिती राहिल.या स्थितीतून मार्ग काढण्याचे काम प्रशासन करीतेय असे नमूद केले.व्यापाºयांना सरसकट दंड आकारणारबाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर दररोज रात्री शेकडो टन सुका कचरा पडून असतो. कोणत्याही व्यापाºयाकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. कुंभारवाड्यात तर नागरिकही रस्त्यावरच कचºयाच्या कॅरिबॅग ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाºयांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, दंड लावणाºया पथकाला दररोज दोन लाखांचे उद्दिष्ट देण्यात येईल.टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, गोमटेश मार्केट आदी भागात रात्री १० नंतर कॅरिबॅग, कागदी पुठ्ठे, विविध मालांवरील पातळ कॅरिबॅग रस्त्यावर फेकून देण्यात येते. व्यापाºयांनीच कचरा रस्त्यावर टाकल्यास शहर कसे स्वच्छ होईल, असा प्रश्न मनपा पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दुकानदाराने सुका कचरा ठेवण्यासाठी डसबिन ठेवल्याच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी मनपाच्या घंटागाडीकडे हा कचरा दिला पाहिजे. व्यापाºयांच्या सोयीसाठी दोनवेळा कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही कचरा रस्त्यावर येत असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी नमूद केले.शहरात कचºयाची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत महापालिका शहर सुंदर, स्वच्छ कसे राहील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खीळ बसविण्याचे काम व्यापाºयांकडून होत आहे. व्यापाºयांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दोन हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा निर्णय महापौरांनी घेतला. अतिरिक्त

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद