‘त्या’ तांदळाचा नमुना तपासणीसाठी औरंगाबादला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:24 IST2017-08-30T00:24:02+5:302017-08-30T00:24:02+5:30
गणेशोत्सवाच्या प्रसादासाठी आणलेला तांदूळ हा प्लास्टिकचा असल्याच्या संशयावरून नायगाव येथे व्यापाºयाला नागरिकांनी धारेवर धरले़ त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या तांदळाचा नमुना घेतला असून प्राथमिक अहवालानुसार हा तांदूळ प्लास्टिकचा नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे़

‘त्या’ तांदळाचा नमुना तपासणीसाठी औरंगाबादला
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: गणेशोत्सवाच्या प्रसादासाठी आणलेला तांदूळ हा प्लास्टिकचा असल्याच्या संशयावरून नायगाव येथे व्यापाºयाला नागरिकांनी धारेवर धरले़ त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या तांदळाचा नमुना घेतला असून प्राथमिक अहवालानुसार हा तांदूळ प्लास्टिकचा नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे़
नायगाव येथील शहाजी गणेश मंडळाने भंडाºयाचे आयोजन केले होते, परंतु भंडाºयातील तांदूळ न शिजल्यामुळे गणेशभक्तांना हा तांदूळ प्लास्टिकचा असल्याचा संशय आला़ यामुळे परिसरातील नागरिकांनी संबंधित व्यापाºयाला धारेवर धरले़ व्यापाºयाने मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसल्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, सोमवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी नायगावला भेट देऊन सदर तांदळाचे नमुने घेतले़ हे नमुने अधिक तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल येण्यास आणखी काही दिवस लागतील़