शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहराचे सार्वजनिक वाहतुकीचे कंबरडे मोडले; धावतात अवघ्या १७ सिटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:35 IST

शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

शहर बससेवा चालविताना गेल्या पाच वर्षांत एस. टी. महामंडळाला झालेला तोटा १६ कोटींवर गेला आहे. शहर बससेवा चालविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे शहर बससेवा चालविताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मनपाने करावी, अन्यथा शहर बससेवा बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना कळविले होते. प्रारंभी नोव्हेंबर २०१६ मध्ये शहर बससेवेपोटी झालेल्या नुकसानीची रक्कम देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली. यानंतरही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

या सगळ्यात शहरात अवघ्या २५ ते ३० शहर बस चालविण्यावर भर देण्यात आला. यामध्येही आता कपात करून काही शहर बस थेट शहराबाहेर चालविण्यात येत आहेत. सध्या केवळ १७ शहर बस सुरू आहेत. यास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांना शहर बसची नुसती प्रतीक्षा करावी लागते. यातून प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  शहर बसच्या अपुऱ्या संख्येमुळे नाईलाजाने आर्थिक भुर्दंड सहन करून रिक्षाने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.  

टॅग्स :state transportएसटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानक