‘रंगसंगीत’वर औरंगाबादची मोहोर!
By Admin | Updated: December 7, 2014 00:20 IST2014-12-07T00:16:41+5:302014-12-07T00:20:15+5:30
औरंगाबाद : नाट्यस्पर्धांमध्ये प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या असणाऱ्या रंगसंगीत एकांकिका स्पर्धेवर औरंगाबादमधील रंगकर्मींनी आपली मोहोर उमटवली आहे.

‘रंगसंगीत’वर औरंगाबादची मोहोर!
औरंगाबाद : नाट्यस्पर्धांमध्ये प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या असणाऱ्या रंगसंगीत एकांकिका स्पर्धेवर औरंगाबादमधील रंगकर्मींनी आपली मोहोर उमटवली आहे. यात पद्य आणि गद्य अशा दोन्ही विभागांत ‘जागरण’, ‘संगीत वात्सल्य’ आणि ‘ग्लोबल आडगाव’ या तीन एकांकिकांना पुरस्कार मिळाले आहेत. सर्वच संघांना सांघिकव्यतिरिक्त इतरही बरीच पारितोषिके मिळाली.
पुण्यातील थिएटर अकॅडमी आणि वोडाफोनतर्फे आयोजित रंगसंगीत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडली. यात संगीत जागरण एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळाले.
वाघ्या-मुरळीच्या जीवनावर आधारित या एकांकिकेतील लोकसंगीत लक्षवेधी ठरले. यासह या एकांकिकेला दहा वैयक्तिक सन्मानही मिळाले. यात लेखन -द्वितीय राजू सोनवणे, गायक अभिनेत्री प्रथम -अमृता तोरडमल, गायक अभिनेता द्वितीय - अमर सोनवणे, वाद्यवृंद द्वितीय -बाळू भुजंग, रोहित भुजंग व संतोष भाले, संगीत दिग्दर्शन द्वितीय -प्रीतम चव्हाण, प्रकाशयोजना द्वितीय -प्रवीण जाधव, दिग्दर्शन तृतीय -अमर सोनवणे यांना पारितोषिके मिळाली. यासह उत्तेजनार्थ पारितोषिक रावसाहेब भुजंग व संतोष गारोळे यांना मिळाले. याच स्पर्धेत सरस्वती भुवन महाविद्यालयातर्फे संगीत वात्सल्य एकांकिका सादर झाली.
या एकांकिकेला सांघिक तृतीय आणि सहा वैयक्तिक सन्मान मिळाले. यात लेखन तृतीय नितीन गरुड, गायिका अभिनेत्री तृतीय रविना सुगंधी व वेदा घोरपडे, गायक अभिनेता प्रभाकर मठपती, वाद्यवृंद उत्तेजनार्थ, संगीत दिग्दर्शन तृतीय प्रवीण पारधे व सागर चक्रनारायण यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या गद्य विभागात देवगिरी महाविद्यालयाच्या ‘ग्लोबल आडगाव’ या एकांकिकेला सांघिक तृतीय सन्मान मिळाला.लेखनासाठी प्रथम व दिग्दर्शनाचे द्वितीय अशी दोन्ही पारितोषिके अनिलकुमार साळवे यांना मिळाली. यासह अभिनय प्रथम- सद्दाम शेख, स्त्री अभिनय प्रथम -चेतना देशपांडे, अभिनय उत्तेजनार्थ -युवराज साळवे यांनी बक्षिसे जिंकली.