राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेत औरंगाबादला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:29 IST2018-02-09T00:29:20+5:302018-02-09T00:29:39+5:30

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेत औरंगाबाद संघाने उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत राज्यभरातील १४0 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत करिश्मा कालिके व ऋतुजा कालिके यांनी महिला दुहेरीत अजिंक्यपद पटकावले.

Aurangabad to be runners-up in state-level pickball competition | राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेत औरंगाबादला उपविजेतेपद

राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेत औरंगाबादला उपविजेतेपद

औरंगाबाद : नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेत औरंगाबाद संघाने उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत राज्यभरातील १४0 खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत करिश्मा कालिके व ऋतुजा कालिके यांनी महिला दुहेरीत अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या एकेरीत कृष्णा मंत्री, मुलींच्या एकेरीत इशिका माळोदे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मिश्र दुहेरीत महेश परदेशी व सलोनी देवडा यांनी उपविजेतेपद पटकावले. पीयूष बगाडिया, आनंद गायकवाड, योगेश तायडे, आदिती जगताप, पृथ्वीराजसिंग राजपूत, अनुराग कुलकर्णी, हर्ष तांबे, गिरिजा बावस्कर यांनीही या स्पर्धेत आपला ठसा उमटवला. या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नीलेश राऊत, सचिव दिनेश वंजारे, सुनील वालावकर, डॉ. उदय डोंगरे, गोकुळ तांदळे, सुबोध जाधव, संजय भूमकर, गणेश बेटुदे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Aurangabad to be runners-up in state-level pickball competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.