औरंगाबाद @ १०.६
By Admin | Updated: December 18, 2014 00:41 IST2014-12-17T23:38:46+5:302014-12-18T00:41:11+5:30
औरंगाबाद : मागील आठ दिवसांपासून थंडीची लाट आल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे. मंगळवारी शहराचे किमान तापमान ११.०० अंश होते.

औरंगाबाद @ १०.६
औरंगाबाद : मागील आठ दिवसांपासून थंडीची लाट आल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे. मंगळवारी शहराचे किमान तापमान ११.०० अंश होते. आज किमान तापमानात घसरण झाली आणि पारा १०.६ अंशांपर्यंत पोहोचला.
थंडीची लाट आल्यामुळे सकाळी धुक्याचा सामना करावा लागतो. शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कानटोपी, पायमोजे, स्वेटर घालून बाहेर पडावे लागत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर थंडी बऱ्यापैकी जाणवत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत थंडीची हुडहुडी कायम राहत आहे. थंडीची लाट आल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्याही पेटत आहेत. बाजारात गरम कपड्यांना मागणी वाढली आहे.
पावसाळा लांबल्यानंतर आता हिवाळाही चांगलाच लांबणार आहे. मात्र, रविवारपासून एक-एक अंश सेल्सियसने तापमान घटत चालले आहे. हुडहुडीपासून बचाव करण्यासाठी तर काही ठिकाणी चहा, कॉफी यांसारख्या गरम पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. जानेवारी महिन्यातील मकर संक्रांतीपर्यंत थंडी कायम राहणार असल्यामुळे नागरिकांना थंडीपासून स्वत:च्या आरोग्याचीही काळजी काही दिवस घ्यावी लागणार आहे.