औंढा न्यायालयाच्या छताचे स्लॅब निखळले

By Admin | Updated: August 31, 2014 00:15 IST2014-08-31T00:08:20+5:302014-08-31T00:15:46+5:30

औंढा नागनाथ : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील छताचे स्लॅब शनिवारी दुपारी ४ वाजता कामकाज सुरू असताना निखळून पडले.

Aunda court's roof slabs shook | औंढा न्यायालयाच्या छताचे स्लॅब निखळले

औंढा न्यायालयाच्या छताचे स्लॅब निखळले

औंढा नागनाथ : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील छताचे स्लॅब शनिवारी दुपारी ४ वाजता कामकाज सुरू असताना निखळून पडले. सुदैवाने या विश्रामकक्षात कोणीही नसल्याने इजा पोहोचली नाही.
औंढा नागनाथ येथील न्यायालयातील वकील संघाच्या बाजूला असलेल्या वकिलांच्या विश्रामगगृहामध्ये दुपारी हा स्लॅब अचानक निखळला. यापूर्वीसुद्धा सतत दोन वर्षांपासून स्लॅब निखळण्याचे सत्र सुरू आहे. स्लॅब निखळण्याची ही तिसरी वेळ आहे. वकील संघाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर यांनी अनेकवेळा न्यायालयातील बांधकामाबाबत तक्रारी दिलेल्या आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची गंभीरतेने दखल घेतली नसल्याने हे स्लॅब कोसळले असल्याची माहिती अ‍ॅड. मगर यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Aunda court's roof slabs shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.