जिल्ह्यातील १८ वाळूपट्ट्यांचे लिलाव
By Admin | Updated: April 11, 2015 00:18 IST2015-04-11T00:06:32+5:302015-04-11T00:18:30+5:30
जालना: जिल्ह्यातील ५७ पैकी १८ वाळू पट्ट्यांचे लिलाव गुरुवारी सर्वोच्च बोलीद्वारे झाले. लिलावासाठी ई- निविदा मागविण्यात आली होती.

जिल्ह्यातील १८ वाळूपट्ट्यांचे लिलाव
जालना: जिल्ह्यातील ५७ पैकी १८ वाळू पट्ट्यांचे लिलाव गुरुवारी सर्वोच्च बोलीद्वारे झाले. लिलावासाठी ई- निविदा मागविण्यात आली होती.
जिल्ह्यातील गिरजा पूर्णा, दुधना, केळणा नद्यांच्या पात्रातून बेसुमार अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. मंठा तालुक्यातील देवठाणा, भुवन, दुधा, जाफराबाद तालुक्यातील गारखेडा, पिंपळखुटा, टाकळी तर अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव, गांधारी व परतूर तालुक्यातील गोळेगाव, सावंगी गंगा येथील वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले.
सर्व वाळू पट्टे मिळून ६८ हजार ८२३ ब्रास एवढा वाळूपटटा शिल्लक आहे. ३९ वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया सुरु आहे.
३९ वाळू पट्ट्यांचे लिलाव न झाल्याने त्या ठिकाणाहून दररोज शेकडो ब्रास वाळूची चोरी होत आहे.
वाळू वाहतूक करणारी मोठी साखळीच कार्यरत असून, महसूल व आरटीओ कडून कारवाई होत असली तरी काही वाळू माफिया या कारवाईस जुमानत नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)