शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

भद्रा मारूती मुर्तीस आणि घृष्णेश्वर मंदीरात आकर्षक तिरंगी सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 17:34 IST

धार्मिकस्थळी देशभक्तीचे एक वेगळे रूप भाविकांना बघावयास मिळाले.

- सुनील घोडकेखुलताबाद( औरंगाबाद ) : देशभरात बुधवारी ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात. यावेळी खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या मुर्तीस तिरंगा झेंड्याचे आकर्षक रूप देवून आकर्षक शृंगार करण्यात आला आहे. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मुर्ती भोवती प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सजावट करण्यात आली. धार्मिकस्थळी देशभक्तीचे एक वेगळे रूप भाविकांना बघावयास मिळाले. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त वाहनावर तिंरगा झेंडा, हॉटेल, दुकानाची तिरंगा रंग संगतीत आकर्षक सजावट आढळून येते. यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिनानिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या मुर्तीस तिरंगा रंगात आकर्षक शृंगार करण्यात आला. नागवेलीचे पाने, मध्यभागी अशोक चक्र असलेला पांढरा कपडा, तसेच मुर्तीस शेंदूर लावलेले असल्याने तो भगवा रंग  असा तिरंगा झेंड्याचे रूप देण्यात आले. खुलताबाद येथील ज्ञानेश्वर नागे, सुनील निकम या हनुमान भक्तांनी ही आकर्षक सजावट केली. या सजावटीचे फोटो लागलीच सोशल मिडियावर व्हायरल झाले. 

घृष्णेश्वर मंदीरात ही सजावट वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरात ही प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री घृष्णेश्वर महादेव पिंडीजवळ रांगोळी व फुलांनी तिरंगा काढण्यात आला होता. भाविकांना धार्मिक व देशभक्तीचे दोन्ही रूप या ठिकाणी बघावयास मिळाले. 

खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ परिसरात गर्दीप्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांनाच सुट्टी असल्याने औरंगाबाद शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणावर पर्यटक व भाविकांनी सहकुंटूब खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ येथील धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट दिली. गर्दीने हा परिसर फुलून गेला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळKhulatabadखुल्ताबाद