हत्ती रिसाला मिरवणुकीने वेधले नागरिकांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:01 IST2017-03-14T23:58:54+5:302017-03-15T00:01:51+5:30
जालना :रंगार खिडकी येथून काढण्यात आलेल्या धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणुकीचा शुभारंभ पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

हत्ती रिसाला मिरवणुकीने वेधले नागरिकांचे लक्ष
जालना : १२८ वर्षाची परंपरा असलेल्या जालना शहरातील धूलिवंदन हत्ती रिसाला उत्सव समितीच्या वतीने रंगार खिडकी येथून काढण्यात आलेल्या धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणुकीचा शुभारंभ पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार बिपीन पाटील, मनोहर जाधव, ओमप्रकाश भारूका, पत्रकार अंकुशराव देशमुख, विश्वासराव भवर यांची उपस्थिती होती. गेल्या तीन वर्षापासून धूलिवंदन हत्ती रिसाला उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा योग मला प्राप्त झाल्याचे पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले. अत्यंत शिस्तीने निघणाऱ्या मिरवणुकीचे कौतुकही त्यांनी केले. पोलिस अधीक्षकांच्या हस्ते भारतमाता, राजा, प्रधान व हत्ती यांचे पुष्पहाराने स्वागत करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. ही मिरवणूक काद्राबाद, सराफा, फुलबाजार, नया बाजार, बडी सडक, सुभाष रोड, पाणीवेस मार्गे रंगारखिडकी येथे विसर्जित करण्यात आली. ढोलताशे, वाद्यवृंदाच्या तालावर नाचून तरूणांनी होळीचा आनंद व्यक्त केला. यावर्षीच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ओल्या रंगाचा वापर न करता हत्तीच्या सोंडेतून कोरड्या गुलालाची विविध रंगाच्या फुलांची उधळण करण्यात आली. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेवड्यांचीही उधळण करण्यात आली.
यावेळी सुभाष देवीदान, दिगांबर पेरे, ओमप्रकाश भिसे, हिरालाल पिपरिये, सुरेश गाजरे, विठ्ठल शिर्के, रमेश गौरक्षक, प्रकाश जगताप, रवींद्र राऊत, चंपालाल भगत, राजेंद्र वाघमारे, जीवनभैय्या विजयसेनानी, इंदर गौरक्षक, गोविंद गाजरे, सतीश जाधव, रामराव मगर, मुकुंद पाथरकर, विजयकुमार पंडित, सुर्यकांत पवार, शंकर नवघरे, सुभाष जाधव, रविचंद खर्डेकर, भगवान सिंधनकर, भगवान सोळुंके, रमेश कोठाळे, मुन्ना गजबी, सुभाष कोटुरवार, पांडुरंग काळे, भास्कर निरवे, हरीभाऊ राऊत, अॅड. प्रविण लाहोटी, कुंडलिक रसाळ, संदीप पवार, अमर ठाकूर, कृष्णा पेरे, दत्ता शिंदे, रावसाहेब पवार, विजय जैन, डॉ. सचदेव, डॉ. सेनानी, रवींद्र बनकर, बाबुराव म्हात्रे काशिनाथ खांडेभराड, कैलास भिसे, प्रमोद सोळुंके, अनिल कोकणे आदींची उपस्थिती होती.