कळमनुरी कॉंग्रेसचे ३0 रोजीच्या बैठकीकडे लक्ष
By Admin | Updated: August 27, 2014 23:38 IST2014-08-27T23:31:35+5:302014-08-27T23:38:51+5:30
हिंगोली : कळमनुरी मतदारसंघ कॉंग्रेसच्या कोट्यात असल्याने व लोकसभेला येथे मताधिक्य मिळाल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे.

कळमनुरी कॉंग्रेसचे ३0 रोजीच्या बैठकीकडे लक्ष
हिंगोली : कळमनुरी मतदारसंघ कॉंग्रेसच्या कोट्यात असल्याने व लोकसभेला येथे मताधिक्य मिळाल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र अजूनही नावनिश्चितीच्या जवळपासही कोणी नसल्याने ३0 आॅगस्ट रोजी खा. राजीव सातव यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कॉंग्रेस इच्छुकांच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला आहे. याच मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या अॅड.सातव यांनी लोकसभा काबीज केल्याने नवा चेहरा द्यावा लागणार आहे. मात्र हा नवा चेहरा नेमका कोणाचा हे ठरविणे कॉंग्रेससाठी मोठी डोकेदुखी आहे. विरोधी पक्षाकडून प्रचारालाही प्रारंभ झाल्यासारखी स्थिती आहे. त्यातच राष्ट्रवादीही या जागेसाठी जोर लावत आहे.
त्यामुळे यात आपण कुठेही मागे राहू नयेत, याची काळजी घेण्यासाठी कॉंग्रेसला वेळेत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.