पेट्रोल अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: August 14, 2014 01:58 IST2014-08-14T01:21:15+5:302014-08-14T01:58:06+5:30
बीड: तालुक्यातील मुळूकवाडी बसस्थानकासमोरील हॉटेल चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आठजणांवर

पेट्रोल अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न
बीड: तालुक्यातील मुळूकवाडी बसस्थानकासमोरील हॉटेल चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आठजणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालिंदर सूर्यभान ढास, कैलास शिवाजी ढास, शिवाजी रंगनाथ ढास, विकास शिवाजी ढास व इतर चार यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील मुळूकवाडी येथील जगन्नाथ सर्जेराव ढास यांचे मुळूक बसस्थानकासमोर हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी आठ आरोपी एका वाहनातून आले. जालिंदर ढास याने जगन्नाथ ढास यांच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकले तर कैलास ढास याने काडी ओढून त्यांच्या अंगावर टाकली.
या दोघांना शिवाजी व विकास ढास यांनी साह्य केले. त्यानंतर आरोपींनी जगन्नाथ यांच्या मुलाच्या हॉटेलमधील फ्रीजचे नुकसान केले. दरम्यान, बरच्या वर्षापासून दिवाणी दाव्याच्या कारणावरुन मारहाण केल्याचे समजते. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि नाईकवाडे करीत आहेत.(प्रतिनिधी)