शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदार असल्याचे सांगत बीएसएनएलचे ३ लाखांचे कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:31 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर घटना, पोलिसांच्या सतर्कतेने चोर रंगेहाथ सापडले, दोघे पसार

छत्रपती संभाजीनगर : बीएसएनएलचे कंत्राटदार असल्याचे भासवून ६ जणांच्या टोळीने बीएसएनएलचे भूमिगत कॉपर वायर कापून चोरण्याचा प्रयत्न केला. गस्तीवरील पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी विचारपूस केली. त्यांना उत्तर देताना भंबेरी उडताच दोघांनी पळ काढला. चार चोर रंगेहाथ हाती लागले. १७ जुलै रोजी पहाटे ४.३० ते ५.३० दरम्यान हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्याचे वेदांतनगरच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले. या वायरची किंमत लाखोंच्या घरात आहे.

किरण गोविंद शिखत (४०, रा. संभाजी कॉलनी, एन-६), इम्रान बशीर शेख (५५), राजू अयुब करीम शेख (३३) व मिनीनाथ पोपट वागसकर (३३, तिघेही रा. अहिल्यानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्तीवर होते. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात, जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर बीएसएनएलच्या भूमिगत वायरसोबत छेडछाड सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी बीएसएनएलचे कंत्राटदार असल्याचे सांगितले. दुरूस्ती काम सुरू असल्याचे सांगितले. प्रश्नांची उत्तरे देताना काहींची भंबेरी उडाल्याचे पाहून अंमलदारांनी पोलिसी खाक्या दाखवला. आपला भांडाफोड होत असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी पळ काढला. चौघे पोलिसांच्या हाती लागले. घटनेची माहिती कळताच बीएसएनएलचे अधिकारी सागर पारचे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

३ लाखांच्या वायरचे तुकडे केलेया चोरीच्या कटात अहिल्यानगर येथील बीएसएनएलच्या काही जुन्या कंत्राटदारांचा सहभाग असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. सदर कॉपर वायरची किंमत बाजारात लाखो रुपये असून ते कुठे असते, कसे कापावे, याची पूर्ण माहिती कंत्राटदारांनाच असते. पळून गेलेल्यांमध्ये कंत्राटदार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिस पोहोचेपर्यंत टोळीने जवळपास ३ लाख २२ हजारांच्या वायरचे तुकडे करून ठेवले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी