शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Crime: निवृत्त प्राध्यापकाची हत्या करून ‘दृश्यम’ स्टाईलनं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 22:05 IST

Chhatrapati Sambhaji Nagar Murder: उसने घेतलेल्या ५० लाख रुपयांसाठी तगादा लावणाऱ्या निवृत्त प्राध्यापकाची त्यांच्याच मित्राने गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

उसने घेतलेल्या ५० लाख रुपयांसाठी तगादा लावणाऱ्या निवृत्त प्राध्यापकाची त्यांच्याच मित्राने गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर ‘दृश्यम’ चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे सीसीटीव्हीमध्ये कार दिसेल असा बनाव करून आपण खून केलेला नाही, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, शहर पोलिसांनी काटेकोर तपास करत रिलस्टारसह तिघांना अटक केली. ही माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रिलस्टार विशाल विकास राठोड (२४, रा. गेवराई तांडा), आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे (रा. घारदोन) अशी आहेत. पोलीस आयुक्त पवार यांनी सांगितले की, राजाराम सुभराव लोंढे (६०, रा. ज्योतीनगर) हे दोन वर्षांपूर्वी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्राध्यापक होते. त्यांची आरोपी विशाल राठोडशी मैत्री होती आणि दोघे अनेकदा एकत्र पार्टी करत असत. विशालला ‘लव्ह अँड डेअर’ नावाचा रिअॅलिटी शो तयार करून तो चॅनेलवर प्रसारित करायचा होता. यासाठी त्याने प्रा. लोंढे यांच्याकडून ५० लाखांहून अधिक रक्कम घेतली होती. मात्र शो प्रत्यक्षात न आल्याने प्रा. लोंढे यांनी पैसे परत करण्यासाठी वारंवार तगादा लावला. त्यामुळे विशालने त्यांची हत्या करण्याचा कट रचला. घटनेच्या तीन दिवस आधी त्याने गेवराई तांडा शिवारात जेसीबीने दोन खड्डे खोदून ठेवले.

५ मार्चच्या रात्री आरोपी विशाल आणि त्याच्या साथीदारांनी प्रा. लोंढे यांना पार्टीच्या बहाण्याने दौलताबाद येथील फार्महाऊसवर नेले. तेथून शहराकडे परतताना रस्त्यात लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबवून प्रा. लोंढे खाली उतरताच त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि मृतदेह कारमध्ये ठेवून शहरातील सिग्मा हॉस्पिटल, कांचनवाडी, ए.एस. क्लब आणि त्यांच्या घराजवळील परिसरात कार फिरवून सीसीटीव्हीमध्ये आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान गेवराई तांडा येथे आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भावाने संशय व्यक्त करताच गुन्हा उघड

प्रा. लोंढे यांचा मोबाईल बंद लागल्याने आणि ते घरी न परतल्याने त्यांचे भाऊ उत्तम सुभराव लोंढे यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. तपासात प्रगती न झाल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन विशाल राठोड आणि त्याच्या साथीदारांवर संशय व्यक्त केला. त्यानंतर गुन्हेशाखेने सखोल तपास करून हा खून उघडकीस आणला.

प्रा. लोंढे यांच्या मोबाईलवर ‘डोन्ट कॉल’ स्टेटस

प्रा. लोंढे यांची पत्नी आणि दोन मुले पुण्यात राहतात. आरोपींनी ८ मार्च रोजी पुण्यात जाऊन त्यांचा मोबाईल सुरू करून ‘I am in personal work, 20–25 days don’t call’ असे स्टेटस ठेवले. मात्र आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या प्रा. लोंढे यांची इंग्रजी लिखाणाची शैली अशी साधी नसल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या जबाबात विसंगती आढळून आली आणि अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मृतदेह पुरलेली जागा दाखवून दिली.

तपास कुणी केला?

गुन्हेशाखेचे डीसीपी रत्नाकर नवले, एसीपी अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे, एपीआय शिवाजी चौरे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अभिषेक चिखलीकर,अंमलदार विजय निकम, विजय घुगे, राहुल बंगाळे, अभिषेक बांठे, सागर शेठे, पूजा भोसले, माया माळी, वनिता तुपे आणि तातेराव शिनगारे त्यांच्या पथकाने तपास करून गुन्ह्याचा छडा लावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Retired professor murdered; 'Drishyam' style cover-up fails, three arrested.

Web Summary : A retired professor was murdered over unpaid debt. The killer attempted a 'Drishyam'-style cover-up, staging alibis via CCTV footage. Police investigation revealed the truth, leading to three arrests, including a 'reel star'.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर