शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

माझ्याकडे का पाहिले म्हणत मुलाचा कान, नाक कापायचा प्रयत्न; नशेखोराचे अघोरी कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:06 IST

जखमीच्या नाक, कानाला २१ टाके, वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, सिडको पोलिसांकडून आरोपीस अटक

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही माझ्याकडे का पाहिले, असे विचारत एका टवाळखोर नशेखोराने अठरावर्षीय तरुणाच्या चेहरा, डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. त्याऱ्या नाक, कानावर गंभीर वार करीत ते कापण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने तरुणाचा प्राण वाचला. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६:३० वाजता एन-५ च्या जिजामाता शाळेसमोर ही गंभीर घटना घडली. राम मोतीराम मुंढे (रा. एन-५), असे आरोपीचे नाव असून, सिडको पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.

महाविद्यालयीन शिक्षण घेणारा सोहम सचिन कापसे (१८, रा. एन-६) हा २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. सर्व मित्र मिळून एन-५ मधील जिजामाता शाळेसमोर बसलेले असताना तेथेच आरोपी रामदेखील हजर होता. तो अचानक सोहम व त्याच्या मित्रांकडे गेला. 'तुम्ही माझ्याकडे पाहताय, माझ्याविषयी काही बोलताय का' असे विचारत शिवीगाळ केली. त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, रामने खिशातून थेट धारदार शस्त्र काढून सोहमवर हल्ला चढवला. त्याच्या तोंड, कपाळ, नाक, कान व डोक्यात गंभीर वार करीत कान कापण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी धाव घेत सोहमला बाजूला घेत खासगी रुग्णालयात नेले.

कान, चेहऱ्यावर तब्बल २१ टाकेसोहमचे वडील सचिन कापसे यांना घटनेविषयी कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सोहमला गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांनी त्याला भरती करून घेतले. त्याचे कान व चेहऱ्यावर तब्बल २१ टाके पडले. त्यानंतर कापसे यांनी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत राम मुंढे याच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून राम मुंढे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नशेच्या आहारी जाऊन मुंढेकडून ही घटना घडल्याचा प्राथमिक संशय आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याचे तपास अधिकारी शिवाजी भोसले यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Man Attacks Youth for Looking, Tries to Cut Ears

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a drunk man attacked an 18-year-old, attempting to cut his ears and nose for allegedly staring. Locals intervened, saving the youth. The accused, Ram Mundhe, is arrested. The victim received 21 stitches. Police suspect the attack was fueled by intoxication.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी